दोन वर्षांच्या चिमुरड्यावर धारावीत अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 04:26 AM2017-10-03T04:26:35+5:302017-10-03T04:26:51+5:30

खेळण्याच्या बहाण्याने दोन वर्षांच्या चिमुरड्याला निर्जन स्थळी नेत, त्याच्यावर २० वर्षांच्या प्लंबरने अनैसर्गिक अत्याचार केले. अत्याचारानंतर पुरावे नष्ट

 Dharavi atrocities on two-year-old girl | दोन वर्षांच्या चिमुरड्यावर धारावीत अत्याचार

दोन वर्षांच्या चिमुरड्यावर धारावीत अत्याचार

Next

मुंबई : खेळण्याच्या बहाण्याने दोन वर्षांच्या चिमुरड्याला निर्जन स्थळी नेत, त्याच्यावर २० वर्षांच्या प्लंबरने अनैसर्गिक अत्याचार केले. अत्याचारानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मुलाला अंघोळ घातली. या प्रकरणी नियाज अहमद खानला धारावी पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार आणि पॉक्सो अंतर्गत अटक केली आहे.
धारावी परिसरात दोन वर्षांचा चिमुरडा कुटुंबीयांसोबत राहतो. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास तो घराबाहेर खळत असताना, खानची वाईट नजर त्याच्यावर पडली. त्याने चिमुरड्याला खेळण्याच्या बहाण्याने बाहेर नेले. निर्जन स्थळी नेत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. अत्याचारानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मुलाला अंघोळ घातली आणि घराबाहेर सोडले. मुलगा रात्री रडत रडत घरी आल्याने, त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्याने खानच्या विकृतीला वाचा फोडली.

खानच्या कुटुंबीयांनी रविवारी याबाबत धारावी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी खानविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला बेड्या ठोकल्या. खानची कसून चौकशी सुरू असल्याचे धारावी पोलिसांनी सांगितले.

Web Title:  Dharavi atrocities on two-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.