राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला झुलवत ठेवले -  हेमंत पाटील  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 08:03 PM2018-08-24T20:03:32+5:302018-08-24T20:04:11+5:30

सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाला अनुसूचित जमाती मध्ये जातीचे दाखले मिळू नये म्हणून झुलवत ठेऊन आपली वोटबँक भरुन घेतली आणि सत्तेचा उपभोग घेतला असल्याचा आरोप भारत अगेन्स्ट करपशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.  

Dhangar community reservation News | राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला झुलवत ठेवले -  हेमंत पाटील  

राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला झुलवत ठेवले -  हेमंत पाटील  

Next

मुंबई -  धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आत्तापर्यंतच्या सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाला अनुसूचित जमाती मध्ये जातीचे दाखले मिळू नये म्हणून झुलवत ठेऊन आपली वोटबँक भरुन घेतली आणि सत्तेचा उपभोग घेतला असल्याचा आरोप भारत अगेन्स्ट करपशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
 
आम्हाला कुठलाही पक्ष नको पण आमच्या धनगर बांधवांना एस टी मध्ये जातीचे दाखले द्या. आज महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आमचा बांधव रस्त्यावर उतरून राग व्यक्त करत आहे, तरी सुद्धा या भाजपा सरकारला जाग येत नाही. राज्य सरकारने टिसचा अहवाल मागुन घेतला नाही म्हणून आम्ही राज्यातील धनगर समाज 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई येथे "भाजप सरकार चले जाव" आक्रोश मोर्चा काढणार आहोत. यावेळी महाराष्ट्रातील 1 ते दिड लाख धनगर समाज उपस्थित राहणार असल्याचा दावा ही पाटील यांनी केला आहे.
यावेळी चक्काजाम  अंदोलन करण्यात येणार आहे. आमच्यातीलच काही भाजपाचे नेते मंडळी समाजात फुट पाड़णयासाठी वेगळी मोर्चाची चुल मांड़ुन शक्ती प्रदर्शन करत आहेत, याची खंत वाटते आहे असे हेमंत पाटील म्हणाले. या वेळी जनहित संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष सायली शिंदे, विक्रम भोसले, राजेश पालवे, समाधान बचिरे हे समन्वयक उपस्थित होते.

Web Title: Dhangar community reservation News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.