Dhananjay Munde threatening renu sharmas family claims victims lawyer | तक्रार मागे घ्या, अन्यथा...; धनंजय मुंडेंनी तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा वकिलांचा आरोप

तक्रार मागे घ्या, अन्यथा...; धनंजय मुंडेंनी तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा वकिलांचा आरोप

मुंबई: एका गायिकेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. त्यातच मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे असून त्यांच्याबद्दल पक्ष योग्य तो निर्णय घेईल, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुंडे यांना लवकरच राजीनामा द्यावा लागू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातच आता रेणू शर्मा यांच्या वकिलानं मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

...तर त्यावेळी माझाही धनंजय मुंडे झाला असता; मनसेच्या नेत्याचे महिलेवर गंभीर आरोप

रेणूच्या भावाला आणि वहिनीला धमकी देण्यात आल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. तुझ्या बहिणीला तक्रार परत घ्यायला लाव, नाहीतर तुझ्या परिवाराला खंडणीच्या गुन्ह्यात आतमध्ये टाकेन. तुम्हा लोकांना माझी पॉवर माहिती नाही अशी धमकी धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आल्याचा मोठा आरोप रेणूच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.

"'ती' मलाही मेसेज, कॉल करायची..." भाजपा नेत्याच्या धडक एन्ट्रीने धनंजय मुंडे प्रकरणाला नाट्यमय वळण

प्रकरण समोर येऊन ४ दिवस झाले तरी अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.  धनंजय मुंडे हे दबाव टाकत आहेत. रेणू विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. माझ्या ताकदीची तुम्हाला कल्पना नाही. बहिणीला गुन्हा मागे घ्यायला सांगा. अन्यथा सगळ्या कुटुंबाला खंडणी प्रकरणात अडकवू, अशी धमकी धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दिल्याचंही वकिलांनी सांगितलं.

आश्चर्यकारक कलाटणी; राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात!

भाजप, मनसेच्या नेत्यांचे रेणू शर्मावर गंभीर आरोप
रेणू शर्मानं आपल्याला फोन करून ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप भाजप आमदार कृष्णा हेगडेंनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मनसेचे नेते मनिष धुरी यांनादेखील रेणूनं फोन केला होता, असा दावा त्यांनी केला. धुरी यांनी याला दुजोरा दिला. रेणू शर्मानं माझ्याशी संपर्क साधला होता. मी वेळीच सावध झालो. अन्यथा माझाही धनंजय मुंडे झाला असता, असं धुरी म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dhananjay Munde threatening renu sharmas family claims victims lawyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.