Join us

'एक बहीण आमदार तर एक खासदार', 'पंकजाताईंच्या घराणेशाही'वर धनुभाऊंचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 18:54 IST

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रस पक्ष हा भाजपापेक्षा मोठ्या प्रमाणात मजबूत आहेत. तेथील नगरपरिषद, जिल्हापरिषदांच्या निवडणुकांमधून स्पष्ट होत आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाकेबाज नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुडेंनी बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडेंच्या घराणेशाहीवर जोरदार प्रहार केला आहे. बीड जिल्ह्याचं राजकारण म्हणजे एकाच घरात सत्ता असून एक बहीण आमदार, एक बहीण खासदार आणि एक बहिण पालकंमत्री असं म्हणत धनंजय मुंडेंनीपंकजा मुंडेंच्या नेतृत्वावर टीका केली. तसेच बीड जिल्ह्याचं राजकारण म्हणजे एका कुटुंबाची मक्तेदारी असल्याचा आरोपही त्यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला. 

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रस पक्ष हा भाजपापेक्षा मोठ्या प्रमाणात मजबूत आहे. तेथील नगरपरिषद, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमधून हे स्पष्ट होत आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकांवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते मुंडेसाहेबांचे निधन झालं, त्यामुळे सहानभूतीचं वातावरण होत. या लाटेमुळे भाजपाचे 7 आमदार निवडूण आले, तर एक जागा राष्ट्रवादीला मिळाली, असे धनंजय मुंडेंनी सांगितलं. तसेच, ज्या अपेक्षेनं गल्लीपासून दिल्लीपासूनची सत्ता एका कुटुंबाकडं दिली. एक बहिण आमदार, एक बहिण खासदार, एक बहिण पालकमंत्री.. संबंध सत्ता तुमच्याकडं. जिल्हा परिषद तुमच्याकडे, जिल्हा मध्यवर्ती बँक तुमच्याकडं पण तुम्ही काय केलं ? आजही आमच्या बीड जिल्ह्यावरील ऊसतोड मजुरांचा जिल्हा हा कलंक आम्ही पुसू शकलो नाहीत. एक सिंचनाचा नवीन प्रकल्प यांनी सुरू केला का, जलयुक्त केलं तेही फक्त कार्यकर्ते पोसायला, असे म्हणत भाजपा नेतृत्वावर टीका केली.  

Exclusive: ...म्हणून शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवावी; सांगताहेत धनंजय मुंडे   

महाराष्ट्रात आज सर्वाधिक दुष्काळाच्या झळा बीड जिल्ह्यात आहेत. तुम्हाला ऑगस्टमध्ये मंत्री म्हणून पाठवलं, पण बीडवासियांना काय मिळालं, असं म्हणत धनंजय मुंडेंनी भाजपा नेत्या आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडेवर निशाणा साधला. दरम्यान, धनंजय मुंडेंनी बीड जिल्ह्याचं राजकारण, अमोल पालेकरांचं भाषण, शरद पवारांची लोकसभा, राष्ट्रवादीची दुसऱ्या फळीची भूमिका यांसह विविध विषयांवर 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्वत:ची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 

टॅग्स :धनंजय मुंडेपंकजा मुंडेबीडआमदार