Dhananjay Munde ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात गाजले. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याचे नाव मुख्य आरोपी म्हणून आले. यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, काल उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर होते. यावेळी आमदार धनंजय मुंडे उपस्थित नव्हते, यावेळी पवार यांनी मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नसल्याचे सांगितले. तर सायंकाळी धनंजय मुंडे यांनी मुलीच्या फॅशन शोला हजेरी लावल्याचे फोटो समोर आले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, आता धनंजय मुंडे यांनी लेक वैष्णवी मुंडे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
उद्धव ठाकरे बोलले, पण राज ठाकरेंची वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर भूमिका काय? समर्थन की विरोध?
वैष्णवी मुंडे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांचा फोटोही शेअर केला आहे. मुंबईमध्ये पार पडलेल्या फॅशन शोची माहिती वैष्णवी मुंडे हिने दिली आहे. या फॅशन शोला स्वत: धनंजय मुंडे, पत्नी राजश्री मुंडे आणि लहान मुलगी अधीश्री उपस्थित होते. मुंडे यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वैष्णवी मुंडेची पोस्ट काय?
Vivienne Westwood ला भारतात आणणे आणि Vivz Fashion School सोबत हा संपूर्ण शो आयोजित करणे हा माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा टप्पा आहे. हा शोला प्रत्यक्षात यशस्वी करण्यासाठी किती परिश्रम आणि धावपळ झाली हे शब्दात मांडणे कठीण आहे. खादी आणि चंदेरी सिल्क सारख्या आपल्या देशी कपड्यांना व्हिव्हियन वेस्टवुडच्या आयकॉनिक डिझाईन्सच्या स्टेजवर केंद्रस्थानी आणल्याचे काम आज झाले आहे,हे फक्त फॅशनच नव्हते तर आधुनिकता आणि वारसा, परंपरा तसेच भारतीय कारागीराला जागतिक स्तरावर आणणे होते, असं वैष्णवी मुंडे हिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
"मला वाटत नाही की मी याआधी कधीही इतका भारावून गेले आहे, चिंताग्रस्त किंवा भावनिकदृष्ट्या एखाद्या गोष्टीत गुंतलेली नाही. ही फक्त एक घटना नव्हती - ती एक जबाबदारी होती. प्रेमाचे श्रम आणि एक निर्णायक क्षण होता. आणि जरी मी काही फोटोंमध्ये हास्यास्पदपणे विचित्र दिसत असले तरी,तीच माझी त्याक्षणाची उत्कंठा व उत्साही प्रतिक्रिया आहे, कारण मी याचा एक भाग होते. ज्यांनी हे घडवून आणले त्या प्रत्येकाचे आभार, ही फक्त सुरुवात आहे असंही वैष्णवीने पोस्टमध्ये म्हटले आहे.