Devendra Fadanvis: ते पुन्हा आले पण... देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 08:13 PM2022-06-30T20:13:41+5:302022-06-30T20:15:04+5:30

देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारमध्ये सहभागी व्हावं असे निर्देश भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतले

Devendra Fadanvis: He came again but ... Devendra Fadanvis took oath as Deputy Chief Minister | Devendra Fadanvis: ते पुन्हा आले पण... देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Devendra Fadanvis: ते पुन्हा आले पण... देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

googlenewsNext

मुंबई - राज्याच्या राजकारणात एकापाठोपाठ एक मोठे ट्विस्ट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधून बाहेर राहण्याची इच्छा होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भाजप समर्थकांमध्ये काहीशी नाराजी पसरली असली तरी, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारमध्ये सहभागी व्हावं असे निर्देश भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतले. त्यामुळे जे. पी नड्डा यांच्या आदेशाचा मान राखत फडणवीस यांनी मोठे मन दाखवले आणि सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 


शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण करुन शपथ घेतली. त्यानंतर, फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी, भाजप समर्थकांनी मोठ-मोठ्याने घोषणाबाजी केली. तसेच, हमारा नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो... अशी घोषणाबाजी राजभवनात झाली. अखेर, मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा आले. पण, ते मुख्यमंत्रीऐवजी उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. त्यामुळे, भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.  

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची गोपनियतेची शपथ दिली. राजभवनात हा छोटेखानी शपथविधी सोहळा झाला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी ही शपथ घेतो, अशी सुरुवात करत शिंदे यांनी शपथ घेतली.

Web Title: Devendra Fadanvis: He came again but ... Devendra Fadanvis took oath as Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.