रतन टाटा यांना 'भारतरत्न' देण्याच्या मागणीला जोर; ऑनलाईन याचिकेला लाखोंचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 15:55 IST2020-04-17T12:31:27+5:302020-04-17T15:55:45+5:30
कोरोना विषाणू विरोधातील लढ्यासाठी टाटा ट्रस्ट टाटा सन्सने १५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

रतन टाटा यांना 'भारतरत्न' देण्याच्या मागणीला जोर; ऑनलाईन याचिकेला लाखोंचा पाठिंबा
मुंबई: टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी एक ऑनलाईन याचिका करण्यात आली आहे. चेंज डॉट ओराजी या वेबसाईटच्या माध्यमातून केलेल्या या याचिकेला 2 लाख 40 हजार लोकांनी सोशल मीडियावर पाठिंबा दर्शवला आहे.
भारतरत्नासाठी नेटकऱ्यांनी केलेल्या ऑनलाइन याचिकेतून रतन टाटा हे परोपकार आणि मानवतेचे उत्तम उदाहरण आहे असं सांगण्यात आले आहे. रतन टाटा यांनी वेळोवेळी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संशोधनासाठी मदत केली आहे. त्यामुळे रतन टाटा यांनी मदत केलेल्या सर्व संस्थांची यादी देखील तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्रुपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या समाजसेवेचीही माहिती यामध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे रतन टटांचे कार्य बघता सोशल मीडियावर भारतरत्न देण्याच्या याचिकेला लाखोंचा पाठिंबा मिळत आहे. तसेच अजूनही ही पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना विषाणू विरोधातील लढ्यासाठी टाटा ट्रस्ट टाटा सन्सने १५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा यांनी एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली होती. टाटांनी या निवेदनात म्हटले होते की, सध्याची भारत आणि जगातील परिस्थिती कमालीची चिंताजनक बनली आहे. त्यावर तातडीने कृती करणे भाग आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा उद्योग समूह कसोटीच्या काळात नेहमीच देशाच्या मदतीस धावून आला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना संसर्गाचा धोका असल्याने अशा डॉक्टरांना घरी जाता येत नाही. त्यामुळे या डॉक्टरांच्या निवासस्थानाची सोय करण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. मात्र अशा डॉक्टरांसाठी आता टाटा समूह पुढे सरसावला आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांना राहण्यासाठी आणि विश्रांतीसाठी टाटा समूहाने आपल्या पंचतारांकित हॉटेलचे दरवाजे उघडले आहेत. यामध्ये ताज महाल पॅलेस, ताज लँड्स एंड, ताज संताक्रूझ, द प्रेसिडेंट, गिंगर एमआयडीसी अंधेरी, गिंगर मडगाव आणि गिंगर नोएडा या हॉटेलांचा समावेश आहे.
नोकरीवरून काढून टाकाल तर याद राखा! पंतप्रधान नरेंद्र मोदींची नजर आहे