Fire Break Out in Prabhadevi : दीपिका पादूकोण राहत असलेल्या ब्यूमॉन्द इमारतीतील एक फ्लॅट सोळा कोटींचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 15:28 IST2018-06-13T15:28:03+5:302018-06-13T15:28:03+5:30
33 मजल्याच्या या इमारतीमध्ये 26 व्या मजल्यावर दीपिकाचं घर आहे.

Fire Break Out in Prabhadevi : दीपिका पादूकोण राहत असलेल्या ब्यूमॉन्द इमारतीतील एक फ्लॅट सोळा कोटींचा!
मुंबई- प्रभादेवी भागात असलेल्या ब्यूमॉन्द इमारतीच्या 33 व्या मजल्यावर बुधवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. ब्यूमॉन्ड ही उच्चभ्रू इमारत असून अनेक सेलिब्रेटी व उद्योगपतींची घरं आहेत. ब्यूमॉन्द या इमारतीमध्ये अभिनेत्री दीपिका पादूकोणचं घर आहे. काही वर्षापूर्वी दीपिकाने या इमारतीमध्ये घर घेतलं होतं. या इमारतीतील एका फ्लॅटची किंमत 16 कोटी आहे. वांद्रे किंवा जुहू भागातील फ्लॅटपेक्षाही कितीतरी जास्त किंमत या इमारतीमधील फ्लॅटची आहे. दीपिकाने या इमारतीमधील फ्लॅट 16 कोटींना विकत घेतला आहे.
2010 साली दीपिकाने ब्यूमॉन्दमध्ये फ्लॅट घेतला असून 2776 स्केअर फूटांचा दीपिकाचा 4 बीएचके फ्लॅट आहे. दीपिकाचा पूर्वाश्रमिचा कथित प्रियकर सिद्धार्थ माल्याने तिला घेऊन दिल्याची चर्चा होती. पण दीपिकाने रितसर बँक लोन घेऊन घर घेतलं आहे. 33 मजल्याच्या या इमारतीमध्ये 26 व्या मजल्यावर दीपिकाचं घर आहे. दीपिका व तिचे वडील प्रकाश पादूकोण यांच्या नावे हे घर आहे.
दरम्यान, ब्यूमॉन्द इमारतीच्या 33 व्या मजल्यावरील ड्युप्लेक्स फ्लॅटला भीषण आग लागली. आगीनंतर इमारतीमधील 90 ते 95 रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं असून या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.