२९ जिल्ह्यांत उद्योग सुरू करण्याचा निर्णय लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 03:17 AM2020-04-15T03:17:39+5:302020-04-15T03:17:39+5:30

सुभाष देसाई : डिक्कीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद

Decision to start industries in 19 districts soon | २९ जिल्ह्यांत उद्योग सुरू करण्याचा निर्णय लवकरच

२९ जिल्ह्यांत उद्योग सुरू करण्याचा निर्णय लवकरच

Next

मुंबई : कोरोना संकटामुळे ठप्प झालेले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी उद्योग विभागाने कृती आराखडा तयार केला असून तो लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला जाईल. त्यानंतर रेड झोन वगळून ग्रीन व आॅरेंज झोनमधील २९ जिल्ह्यांतील उद्योग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी येथे दिली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त व दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीच्या (डिक्की) १५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी डिक्कीच्या सदस्य व पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, डिक्की वेस्ट इंडियाचे अध्यक्ष निश्चय शेळके, मुंबईचे उपाध्यक्ष पंकज साळवे यांच्यासह सुमारे पाचशे उद्योजक सहभागी झाले होते.

लघु, मध्यम व सुक्ष्म उद्योगांना कोरोनाच्या संकटामुळे येणाºया अडचणींबाबत डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे व पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. देसाई म्हणाले की, राज्य शासन या संकटात उद्योजकांच्या पाठीशी उभे आहे. ग्रीन व आॅरेंज झोनमधील उद्योग सुरू करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. कृती दलाचा अहवाल आल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल, असे देसाई यांनी सांगितले.

गृहमंत्र्यांविरोधात पोस्ट, भाजप प्रवक्त्यावर गुन्हा
नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल बदनामीकारक फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली. नागपूर ग्रामीणच्या कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Web Title: Decision to start industries in 19 districts soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.