दिशा सालियान मृत्यू , एसआयटी स्थापन; अपर पोलिस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन नेतृत्व करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 09:35 AM2023-12-13T09:35:31+5:302023-12-13T09:38:23+5:30

मुंबई पोलिसांनी मंगळवारी एसआयटी स्थापन केली आहे.

Death of Disha Salian Establishment of SIT | दिशा सालियान मृत्यू , एसआयटी स्थापन; अपर पोलिस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन नेतृत्व करणार

दिशा सालियान मृत्यू , एसआयटी स्थापन; अपर पोलिस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन नेतृत्व करणार

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियान आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारकडून विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमण्याचे आदेश देताच, मुंबई पोलिसांनी मंगळवारी एसआयटी स्थापन केली आहे.  अपर पोलिस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन हे एसआयटीचे नेतृत्व करणार आहेत.

हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान मृत्यूप्रकरणी एसआयटी नेमून चौकशीचे आदेश दिले होते. अखेर मंगळवारी मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश मिळताच, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी फेरतपासाचा आदेश दिला. परिमंडळ-११ चे पोलिस उपायुक्त अजय बन्सल आणि मालवणी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव प्रकरणाचा तपास करणार आहेत.

८ जूनच्या २०२०  मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रिजेंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून  दिशा पडली होती. ११ जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.  शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

...तर संबंधितांना चौकशीसाठी बोलावणार

दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने आरोप सुरू होते. आता विशेष चौकशी स्थापन करण्यात आल्यानंतर पुन्हा नव्याने तपास होणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या बाबी, तसेच कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करण्यात येत आहे. यातून आवश्यक वाटल्यास संबंधितांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल. त्यानुसार, एसआयटी पथक तपास करत आहे.

Web Title: Death of Disha Salian Establishment of SIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस