coronavirus: अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली वाहतूक, २० गुन्ह्यांची नोंद; पोलीस तपासणी होणार अधिक कडक   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 03:59 AM2020-05-11T03:59:06+5:302020-05-11T03:59:51+5:30

मजुरांची वाहतूक करणारी वाहने अत्यावश्यक सेवा असल्याचे बोर्ड लावून पळ काढत असल्याने पोलिसांकडून तपासणी आणखीन कडक करण्यात आली आहे. 

coronavirus: transport in the name of essential services, 20 crimes recorded; The police investigation will be more stringent | coronavirus: अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली वाहतूक, २० गुन्ह्यांची नोंद; पोलीस तपासणी होणार अधिक कडक   

coronavirus: अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली वाहतूक, २० गुन्ह्यांची नोंद; पोलीस तपासणी होणार अधिक कडक   

Next

मुंबई : प्रशासनाकडून परराज्यातील मजुरांसाठी उपाययोजना सुरू असतानाही काही मजूर ट्रक, टेम्पोतून जीवघेणा प्रवास करत आहे. शनिवारी अवैध वाहतूक प्रकरणी मुंबईत २० गुन्हे नोंद झाले. मजुरांची वाहतूक करणारी वाहने अत्यावश्यक सेवा असल्याचे बोर्ड लावून पळ काढत असल्याने पोलिसांकडून तपासणी आणखीन कडक करण्यात आली आहे. राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या विविध नियमांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख १ हजार ३१६ गुन्हे नोंद आहे. तर मुंबईतील ६ हजार ९२ गुन्ह्यांचा यात समावेश आहे. तर अवैध वाहतुक प्रकरणी १ हजार २९१ गुन्हे नोंद आहे. तर १९ हजार ५१३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर ५५ हजार ६५० वाहने जप्त करण्यात आले आहेत.        
सध्या झोनल अधिकारी असलेल्या १२ परिमंडळातील पोलीस उपायुक्ताच्या नेतृत्वात कामगारांना परराराज्यात पाठवण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. तर एसटीही सोडण्यात येत आहे. असे असतानाही काही मजूर ट्रक, टेम्पोचा आधार घेत धडपड करत आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली हे मजूर ट्रक, टेम्पोतून गावाकडे जात असल्याने पोलिसांना या ट्रकची तपासणी करणे गरजेचे बनले आहे.
एका ट्रकमधून ४५ ते ५५ मजूर जात आहेत. शनिवारी मुंबईत अवैध वाहतूक प्रकरणी २० गुन्हे नोंद आहेत. तर आतापर्यंत तब्बल ९०९ गुन्ह्यांची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे. आरएके मार्ग पोलिसांनी केलेल्या १६० जणांवरील कारवाईपाठोपाठ  शनिवारी  पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विक्रोळी वाहतूक चौकीजवळ पोउनि मोरे, वाघमोडे पंतनगर वन मोबाईलसह नाकाबंदी करीत असताना अशाच एका ट्रकचालकाला पोलिसांनी अडवले. चालक नामे अब्दुल जब्बार मुख्तार शहा हा एकूण ७०  प्रवाशांना विनापरवाना कुर्ला  येथून लखनौ, उत्तर प्रदेश येथे घेऊन जात होता. त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे़

अफवांची भर
नाशिकवरून ट्रेन सुटत असल्याच्या माहितीने हजारो मजूर पायीच नाशिकची वाट धरत आहेत. तर काहींनी अशा ट्रकचालकांना हाताशी धरले आहे. यात त्यांची फसवणूक होत आहे. संयम ठेवा... मुंबई पोलिसांकडून कामगारांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच प्रशासनाकडूनही सर्वाना गावी पोहोचविण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मजुरानी संयम ठेवणे गरजेचे आहे. 
एसटीभोवती स्थानिकांचीही गर्दी
च्राज्यातील प्रवासासाठी एसटीने जाण्यासाठी अन्य चाकरमानीही गर्दी करताना दिसले. रविवारी भांडुप परिसरातही अशीच गर्दी पाहावयास मिळाली. त्यामुळे मुंबईत अडकलेल्यांबरोबर मुंबईतील मंडळी याचा फायदा घेत गाव गाठण्याचा प्रयत्न करताना दिसले. 

कोरोनाचा वाढता धोका : या प्रवासामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजत आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

Web Title: coronavirus: transport in the name of essential services, 20 crimes recorded; The police investigation will be more stringent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.