Coronavirus: देवेंद्र फडणवीसांवरील टीकेवरुन रोहित पवार आणि भाजपा आमदारात ‘तू तू मै मै’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 11:34 AM2020-05-20T11:34:16+5:302020-05-20T11:35:04+5:30

ट्विटरवरुन रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला तर भाजपा आमदारने प्रत्युत्तर दिलं.

Coronavirus: Rohit Pawar and BJP MLA War on Twitter over criticize Devendra Fadnavis pnm | Coronavirus: देवेंद्र फडणवीसांवरील टीकेवरुन रोहित पवार आणि भाजपा आमदारात ‘तू तू मै मै’

Coronavirus: देवेंद्र फडणवीसांवरील टीकेवरुन रोहित पवार आणि भाजपा आमदारात ‘तू तू मै मै’

Next

मुंबई – राज्यात कोरोनाचं संकट असतानाही राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं दिसून येतं. मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कोरोना संकट हातळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय असा आरोप केला.

या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने कोणतंही विशेष पॅकेज जाहीर केले नाही असं सांगत सरकारवर आरोप केले. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. त्यांनी ट्विटरमध्ये असं म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस, जी आरोप-प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून त्यावर महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरु शकेल असा टोला लगावला.

त्यासोबतच शरद पवारांनी केंद्र सरकारला पत्र पाठवलं, पवारांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं. त्यामुळे या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल असं मला वाटतं असा चिमटाही रोहित पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

दरम्यान, यानंतर रोहित पवारांच्या टीकेला भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत हे आपण मान्य केले हे योग्यच झालं. भाजपाने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न केला पण त्याला अशी स्वयंअग्रेषित उत्तरे येतात असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेला ईमेल जोडला. त्याचसोबत मागूनही वेळ मिळत नसेल तर काय करणार? तसेच शरद पवारांच्या मार्गदर्शनाची गरज आज राज्याला सर्वाधिक आहे. हे राज्याच्या स्थितीवरुन स्पष्ट होते असा टोला हाणला.

त्यावरही रोहित पवारांनी कोरोनाच्या संकटाशी संपूर्ण राज्य अहोरात्र लढण्यात व्यस्त असताना एकच दिवस आधी केलेल्या पत्रव्यवहाराचा योग्य रिप्लाय प्राप्त होण्यासाठीचा संयम नक्कीच आपल्याकडे असेल अशी अपेक्षा मी आपल्यासारख्या अनुभवी नेत्याकडून करतो असं प्रत्युत्तर दिलं.

त्याचसोबत सरकार कोणत्याही पक्षाचं असो, राज्यातलं असो की केंद्रातलं असो, जनतेच्या हितासाठी राजकारण न करता शरद पवार साहेब अनुभवाच्या बळावर नेहमीच अधिकारवाणीने सर्वांनाच योग्य मार्गदर्शन करत असतात असंही त्यांनी स्पष्ट केले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

भारताविरोधात चीन आखतंय ‘ही’ मोठी युद्धनीती; लडाख सीमेवरील हालचालींवर करडी नजर!

ओडिशामध्ये ‘अम्फान’ चक्रीवादळाच्या प्रकोपाला सुरुवात; अनेक झाडं कोसळली

असं काय घडलं? नवविवाहित पत्नीसोबत कोरोना योद्धा डॉक्टरवर आली चहा विकण्याची वेळ!

आमदार रोहित पवार अन् निलेश राणे यांच्यातील ‘ट्विटर युद्ध’ पेटलं; मला, बोलत राहिलास तर...

 

Read in English

Web Title: Coronavirus: Rohit Pawar and BJP MLA War on Twitter over criticize Devendra Fadnavis pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.