Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : 31 मेनंतर लॉकडाऊन राहणार की उठणार?; उद्धव ठाकरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 14:34 IST

CoronaVirus News : कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे, सोशल डिस्टन्सिंग पाळा, तोंडाला मास्क लावा, रस्त्यावर थुंकू नका, हात वारंवार स्वच्छ ठेवा हे करावं लागणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

ठळक मुद्देकोरोनाचे रुग्ण आणखी काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढणार असून, गुणाकाराने कोरोना पसरणार आहे. लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवा, ज्या पद्धतीने हळूहळू लॉकडाऊन घालण्यात आला तसंच हळूहळू लॉकडाऊन उठवण्यात येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे, सोशल डिस्टन्सिंग पाळा, तोंडाला मास्क लावा, रस्त्यावर थुंकू नका, हात वारंवार स्वच्छ ठेवा हे करावं लागणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

मुंबई – कोरोनाचे रुग्ण आणखी काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढणार असून, गुणाकाराने कोरोना पसरणार आहे. लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवा, ज्या पद्धतीने हळूहळू लॉकडाऊन घालण्यात आला तसंच हळूहळू लॉकडाऊन उठवण्यात येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे, सोशल डिस्टन्सिंग पाळा, तोंडाला मास्क लावा, रस्त्यावर थुंकू नका, हात वारंवार स्वच्छ ठेवा हे करावं लागणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.कोरोनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहा, आपण जगायचं कसं हे कोरोनामुळे शिकलो आहे. लॉकडाऊन अचानक उठवता येणार नाही, आता 'लॉकडाऊन' शब्द वापरू नका, हळूहळू आयुष्याची गाडी मार्गावर आणू, पुढील काही महिने मास्क घालावे लागतील, सतत हात धुवावे लागतील, एकमेकांपासून अंतर राखणे, रस्त्यावर न थुंकणे अशा गोष्टींचं पालन करावं लागणार आहे. लॉकडाऊन शब्द न वापरता आम्ही काय काय सुरू करणार याची यादी देऊ, या गोष्टी सुरळीत राहण्याची जबाबदारी सरकारपेक्षा लोकांची जास्त आहे. पुढील काही दिवस धार्मिक, सामाजिक, सण-उत्सव घरातच साजरे करा, प्रत्येक धर्मातील लोकांनी आपापल्या ईश्वराकडे प्रार्थना करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले.

पावसात जास्त काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा, रोगराई आणि साथी आपल्याला टाळायला हव्या, पाणी उकळून प्या, सर्दी, खोकला दिसल्यात तातडीनं डॉक्टरकडे जाण्याची गरज असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. सर्दी, खोकला आणि ताप ही कोरोनाची लक्षण असली तरी वास न येणे, थकवा जाणवणे, वास येत नसल्यास लागलीच डॉक्टरांशी संपर्क साधा. वेळेत रुग्णांवर उपचार सुरू केल्यामुळे ते ठणठणीत होऊन घरी गेले आहेत. मराठवाडा, विदर्भ याच्यासह उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा ग्रामीण भागातील जनतेनेही चांगले सहकार्य केले आणि कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवला.

कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली आहे. हा विषाणू गुणाकार करतो, त्याच्या गुणाकाराला कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही शिस्त पाळल्यानं रुग्णांची संख्या आटोक्यात आली. सरकारची सुरुवात झाली अन् कोरोनाचं संकट समोर आल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. कोरोना रुग्णांची आबाळ होत आहे, हे सत्य आहे, पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे संकट आलं आहे, सध्या सात हजार, तर मेअखेरपर्यंत १३ ते १४ हजार बेड्स उपलब्ध असतील. जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे लक्षात आलं आहे, फिल्ड हॉस्पिटलमध्ये तशी सोय केली आहे, राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज आहे, पुढील आठ ते दहा दिवस पुरेसा रक्तसाठा आहे, पण इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी रक्तदात्यांना केलं आहे.

हेही वाचा

CoronaVirus News : लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय?, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

भारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार 

Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल

Coronavirus : "माणसाच्या कामाक उद्या माणूसच येतलो"; खाकीतला वॉरियर्स कलेतून देतोय संदेश

दिल्लीच्या सरकारी जाहिरातीमध्ये सिक्कीमला दाखवला भारताचा शेजारी 'देश'; उडाली खळबळ

मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरे