CoronaVirus News: There will be lockdown in the containment zone in the state even after 31 may | CoronaVirus News: राज्यात कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ मेनंतरही लॉकडाउन राहणार

CoronaVirus News: राज्यात कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ मेनंतरही लॉकडाउन राहणार

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर मात करण्यासाठी म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, धुळे, जळगाव या रेड झोनमधील शहरांत काही प्रमाणात शिथिलता देऊन कन्टेन्मेंट विभागात लॉकडाऊनचा कालावधी ३१ मेनंतरही वाढवावा लागेल, असा सूर मुंबईत झालेल्या बैठकीत निघाला. १ जूनला सगळेच व्यवहार सुरळीत होतीलच असे नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, खा. संजय राऊत, मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई मनपा आयुक्त आय .एस. चहेल, आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांची या बैठकीत उपस्थिती
होती.

अ‍ॅम्ब्युलन्स कंट्रोल रूमला जोडणार

मुंबईत आता आणखी ४५० अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात आल्या आहेत. त्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉॅर्म तयार करण्यात आला असून या ४५० ड्रायव्हरना मोबाईल देण्याचा निर्णय मुंबई मनपा आयुक्त आय. एस. चहेल यांनी घेतला आहे. त्याचे कनेक्शन कंट्रोल रुममध्ये असेल. त्यामुळे ती अ‍ॅम्ब्युलन्स कुठे आहे त्याची माहिती मिळेल. त्याशिवाय मुंबईत बीपीटीमध्ये कॉटन एक्स्चेंजजवळ २ हजार बेडचे रुग्णालय उभारण्यात येत आहेत.येत्या १० दिवसांत तब्बल १ लाख बेड तयार करण्याचा निर्णयही आयुक्त चहल यांनी घेतला असून, हे सगळे बेड नियंत्रण कक्षातून नियंत्रित केले जाणार आहेत.

खासगी रुग्णालयांना अध्यादेश बंधनकारकच

खासगी रुग्णालयांना नव्या आदेशानुसार ८० टक्के खाटा कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी माफक दरात ठेवाव्याच लागतील.
उपचारांच्या खर्चासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तुटीची भरपाई सरकारने देण्याचा प्रश्नच येत नाही.

कोरोना रुग्णांच्या उपचाराचा भार सरकारी रुग्णालयांवर आहे, असे स्पष्ट प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
अनेक खासगी रुग्णालये एकीकडे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता सांगतात आणि दुसरीकडे कर्मचाºयांच्या वेतनातील तुटीची भरपाई मागतात, हा विरोधाभास असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात एका दिवसात २,६०८ रुग्णांची भर

राज्यात शनिवारी २,६०८ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० झाली आहे, तर ८२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी झाली असून, एकूण मृत्यू संख्या १,५७७ झाली आहे. मुंबईमध्ये ४०, पुण्यात १४, सोलापुरात २, वसई विरारमध्ये १, साताºयात १, ठाण्यात १, तर नांदेड शहरातील एकाचा मृत्यू झाला. 

50,000 रुग्ण घरी परतले

देशात गेल्या २४ तासांत ६६०० नवे रुग्ण आढळले असून, एका दिवसात पहिल्यांदाच इतकी मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा १ लाख २५ हजार १0१ झाला असून, त्यापैकी ५0 हजारांहून अधिक जण बरे होऊन घरी परतले आहेत. 3,720 जण आतापर्यंत देशात कोरोनामुळे मरण पावले आहेत. देशातील मृत्यूदर ३.०२ टक्के आहे. ५९ हजार ६०० जणांवर उपचार सुरू आहेत.

जगभर कहर सुरूच

53,65,000 कोरोना रुग्ण जगभरात झाल्याने या संसर्गजन्य आजाराबाबत सर्वत्र भीतीचे वातावरण कायम आहे. आतापर्यंत 3,42,021
जण मरण पावले असून, त्यापैकी सुमारे ९८ हजार अमेरिकेतील आहेत. तिथे रुग्णसंख्या १६ लाख ४९ हजार आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशियात 3,41,000 जणांना लागण झाली आहे.

Web Title: CoronaVirus News: There will be lockdown in the containment zone in the state even after 31 may

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.