CoronaVirus News: मुंबईत कोरोनामुळे आणखी ३८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 06:32 IST2020-05-26T03:31:01+5:302020-05-26T06:32:36+5:30
३८ रुग्णांपैकी २७ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील २६ रुग्ण पुरुष, १२ रुग्ण महिला होत्या.

CoronaVirus News: मुंबईत कोरोनामुळे आणखी ३८ जणांचा मृत्यू
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच असून, मृत रुग्णांच्या संख्येतही भर पडत आहे. सोमवारी मुंबईत ३८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण १,०२६ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
३८ रुग्णांपैकी २७ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील २६ रुग्ण पुरुष, १२ रुग्ण महिला होत्या. मृत रुग्णांपैकी तिघांचे वय ४० पेक्षा कमी होते. १५ जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित २० जणांचे वय ६० वर्षांदरम्यान होते.
सोमवारी धारावीमध्ये कोरोनाची नव्याने ४२ प्रकरणे आढळली. येथील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १ हजार ५८३ झाला आहे. दादरमध्ये नव्याने २० प्रकरणे आढळली. येथील कोरोनाबाधितांचा आकडा २३९ झाला आहे. माहीम येथे नव्याने कोरोनाची ३४ प्रकरणे आढळली. येथील एकूण आकडा ३५१ झाला आहे.
सोमवारचा अहवाल
भरती संशयित रुग्ण - ८२५
बाधित रुग्ण - १,४३०
बरे झालेले - ३३०
मृत - ३८