CoronaVirus News: 2,598 infected during the day; Corona has 59,546 patients | CoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर

CoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर

मुंबई : राज्यात गुरुवारी दिवसभरात २,५९८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ५९ हजार ५४६ इतकी झाली आहे. यापैकी बरे झालेले आणि मृतांचा आकडा वगळता राज्यातील ३८ हजार ९३९ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिवसभरात ८५ जणांचा मृत्यू झाला असून ६९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १८ हजार ६१६ नागरिक कोरोनामुक्त झाले, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३१.२६ टक्के एवढे आहे, तर मृत्यूदर ३.३२ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ६,१२,७४५ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ३५,१२२ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील आजच्या ८५ मृतांमध्ये ६० पुरुष, तर २५ महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक ३८ रुग्ण मुंबईतील आहेत. याशिवाय, वसई-विरार ४, ठाणे ४, नवी मुंबई २, रायगड, जळगाव, नांदेड येथे प्रत्येकी १, पुणे मनपा क्षेत्रातील १०, सातारा ९ आणि सोलापूर मनपा भागातील ७, औरंगाबाद येथील ३ तर अकोला मनपा क्षेत्रातील ५ मृतांचा समावेश आहे. मृतांपैकी ४५ जणांमध्ये (५३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड-१९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १९८२ झाली आहे. आजपर्यंत प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या ४,१९,४१७ नमुन्यांपैकी ५९,५४६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २८१६ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून ६५.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

6,500 नवे रुग्ण देशात

गेल्या २४ तासांत देशात ६,५०० नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांचा आकडा १ लाख ५८ हजार ३३३ झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने ४,५३१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ६७ हजार ६९१ जण बरे झाले आहेत. मुंबईबरोबरच केरळ, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि दिल्ली या पाच राज्यांत रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्लीत रुग्णसंख्या १६ हजारांच्या घरात गेली आहे.

58,58,392 जगभरातील बाधित

जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये रोजच्या रोज भर पडत असून, गेल्या २४ तासांत ७४ हजार नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण आता ५८ लाख ५८ हजारांच्या वर गेले आहेत. एकट्या रशियात गुरुवारी ८,४०० रुग्णांची भर पडली. जगात आतापर्यंत कोरोनाने ३ लाख ५९ हजार ९७१ जण मरण पावले आहेत. सध्या २९ लाख ४४ रुग्ण उपचार घेत असून, २५ लाख ४१ हजार जण बरे झाले आहेत. उपचार घेणाऱ्यांपैकी २ टक्के रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: 2,598 infected during the day; Corona has 59,546 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.