CoronaVirus in Mumbai धक्कादायक! सीएसएमटीवरील रेल्वे पोलिसाला कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 20:21 IST2020-03-31T20:20:31+5:302020-03-31T20:21:09+5:30
कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या सोबतच्या 25 पोलिसांची देखील तपासणी केली जात आहे.

CoronaVirus in Mumbai धक्कादायक! सीएसएमटीवरील रेल्वे पोलिसाला कोरोनाची लागण
मुंबई : सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार यांना कोरोनाची लागण झाली असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 15 मार्च पासून ते 27 मार्चपर्यंत त्याच्या संपर्कात आलेल्या 25 पोलिसांची देखील तपासणी केली जात आहे.
30 मार्च रोजी पोलीस हवालदार यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि सतत खोकला येऊ लागला. त्यामुळे कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. येथे उपचार घेतल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या सोबत 15 मार्च ते 22 मार्च आणि 24 मार्च ते 27 मार्च सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि लॉकअप गार्ड येथे संपर्कात आलेल्या 25 पोलीस कर्मचाऱ्यांना कस्तुरबा रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे.