coronavirus: आता एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पात आरोग्य केंद्राची होणार उभारणी, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 06:44 PM2020-06-12T18:44:10+5:302020-06-12T18:44:21+5:30

एसआरए प्रकल्पाअंतर्गत वास्तव्यास असलेल्या प्रत्येक नागरिकाला यापुढे त्याच ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.

coronavirus: Jitendra Awhad announces to set up health centers in every SRA project | coronavirus: आता एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पात आरोग्य केंद्राची होणार उभारणी, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

coronavirus: आता एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पात आरोग्य केंद्राची होणार उभारणी, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

Next

ठाणे  : कोरोनाचा प्रभाव हा झोपडपटटी भागात अधिक प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सर्वाच्याच चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे यापुढे झोपडपटटीचा विकास एसआरए योजने अंतर्गत करतांना प्रत्येक एसआरए प्रकल्पात एक ते 5 हजार स्वेअर फुटांचे आरोग्य केंद्र उभारण्यात येईल अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ायंनी केली आहे. तशा स्वरुपाचे आदेशही पारीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. आव्हाड यांनी शुक्रवारी एक ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे एसआरए प्रकल्पाअंतर्गत वास्तव्यास असलेल्या प्रत्येक नागरिकाला यापुढे त्याच ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.

कोरोनाचा शिरकाव मागील दिड महिन्यात झोपडपट्टी भागात झाला आहे. मुंबईतील धारावी असो किंवा ठाण्यातील झोपडपटटीचा भाग किंवा इतर महापालिकांच्या ठिकाणाच झोपडपटटी भाग या सर्वच ठिकाणी कोरोनाचा प्रभाव दिवसागिणक वाढत आहे. त्यामुळे त्यांना लागलीच उपचार मिळण्यासाठी देखील कठीण होत आहे. तसेच त्यांना क्वॉरान्टाइन करणो, त्यांच्या संपर्कातील रुग्णांचा शोध घेणो यासाठी तारेवरची कसरत सुरु आहे. एवढे करुनही कोरोनाचा प्रभाव झोपडपटटी भागातून कमी झालेला नाही. त्यामुळे आता यापुढे ज्या ज्या भागांमध्ये एसआरए अंतर्गत झोपडपटटींचा विकास होईल त्या ठिकाणी प्रत्येक एसआरए स्कीममध्ये 1 हजार ते पाच हजार स्केअर फुटांचे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. विशेष म्हणजे हे आरोग्य केंद्र उभारतांना फ्री ऑफ एफएसआय बेसीसवर बांधण्याचा निर्णयही एसआरएने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्या आशयाचे आदेशही पारीत करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: coronavirus: Jitendra Awhad announces to set up health centers in every SRA project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.