coronavirus: Excessive rainfall will not increase the risk of coronavirus - experts say | coronavirus: अतिवृष्टीमुळे कोरोनाचा धोका वाढणार नाही - तज्ज्ञांचे मत

coronavirus: अतिवृष्टीमुळे कोरोनाचा धोका वाढणार नाही - तज्ज्ञांचे मत

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने ८३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यात आता हवामान विभागाने मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पावसामुळे कोरोनाचा धोका वाढणार का, असा सवाल मुंबईकरांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे, मात्र आता वैद्यकीय तज्ज्ञांनी या पावसामुळे कोरोनाचा धोका वाढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता व पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, पावसामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल अशी शक्यता नाही. याला कोणताही आधार नाही.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: Excessive rainfall will not increase the risk of coronavirus - experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.