मुंबई : राज्य सरकारने नवरात्रौत्सवासंदर्भातील नियमावली तातडीने जाहीर करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तीची उंची किती असणार, सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार, याबाबतची स्पष्टता वेळीच मूर्तिकारांना द्यावी, अशी मागणी शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.गणेशोत्सवाची नियमावली जाहीर होण्यास विलंब केल्याने मूर्तिकारांचे नुकसान झाले. कारखान्यात चार फुटांपेक्षा उंच असलेल्या मोठ्या मूर्ती शिल्लक राहिल्या. बहुसंख्य मूर्तिकार देवीच्या मूर्ती घडवत असल्याने त्यांना वेळीच स्पष्टता देण्याची गरज असल्याचे मत शेलार यांनी व्यक्त केले.
coronavirus: ‘नवरात्रीबाबत आताच नियमावली जाहीर करा’, आशिष शेलार यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 02:16 IST