Coronavirus: राज्यात दिवसभरात २३२ कोरोना रुग्ण आढळले; एकूण रुग्णांचा आकडा ३ हजारांच्या उंबरठ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 20:43 IST2020-04-15T20:41:42+5:302020-04-15T20:43:24+5:30
राज्यात दिवसभरात ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ८९६ इतकी झाली आहे.

Coronavirus: राज्यात दिवसभरात २३२ कोरोना रुग्ण आढळले; एकूण रुग्णांचा आकडा ३ हजारांच्या उंबरठ्यावर
मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ९१६ पर्यंत पोहचली असून मृतांचा आकडा १८७ पर्यंत पोहचला आहे. आज दिवसभरात राज्यात २३२ कोरोना रुग्ण आढळले. तसेच ३५ कोरोनाग्रस्तांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आजतागायत २९५ कोरोनाबाधित उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात दिवसभरात ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ८९६ इतकी झाली आहे. तर ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे १२, ठाणे मनपा ९७, नवी मुंबई ६८, केडीएमसी ५०, उल्हानगर, भिवंडी प्रत्येकी १, मीरा-भाईंदर ५१, पालघर ५, वसई-विरार ३२, रायगड ५, पनवेल १० अशाप्रकारे ठाणे मंडळात एकूण २ हजार २२८ रुग्ण आढळले आहेत तर १२९ जणांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक ४, मालेगाव ४८, अहमदनगर २७, धुळे २, जळगाव २, अशाप्रकारे एकूण ८३ रुग्ण आढळले आहेत तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे मनपा आणि जिल्हा ३७२, पिंपरी चिंचवड ३५, सोलापूर २, सातारा ६ असे पुणे मंडळात एकूण ४१५ रुग्ण आढळले तर ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर येथे ५५ अन् गोंदिया १ अशाप्रकारे विदर्भात एकूण ५६ रुग्ण आहेत तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अकोला येथे १३, अमरावती ६, यवतमाळ ५, बुलढाणा २१, वाशिम १ रुग्ण आहेत. मराठवाड्यात लातूर ८, उस्मानाबाद ४, बीड १, औरंगाबाद २३, जालना १, हिंगोली १ असे रुग्ण आढळलेत. कोल्हापूर ६, सांगली २६, सिंधुदुर्ग १, रत्नागिरी ६ असे रुग्ण आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२ हजार नमुन्यांपैकी ४८ हजार १९८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २९१६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६९ हजार ७३८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ५६१७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईचे २, पुण्यातील ६ तर अकोला मनपा येथील १ रुग्ण आहे. त्यात ६ पुरुष तर ३ महिला आहेत