Join us

Coronavirus : कोरोनाचा भारतीय नौदलात शिरकाव, 20 नौसैनिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 08:35 IST

Coronavirus : भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढ त आहे. आतापर्यंत 400 हून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

मुंबई - जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 1,54,247  हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2,250,432 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 571,577 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 400 हून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढला असून रुग्णांची संख्या 13,000 वर गेली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसने आता भारतीय नौदलातही शिरकाव केला आहे. तब्बल 20 नौसैनिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील नौदलाच्या तळावरील 20 नौसैनिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईतीलच नौदलाच्या रुग्णालयात या नौसैनिकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतात लॉकडाऊननंतर कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला आहे. लॉकडाऊनआधी केवळ 3 दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट होत होते. आता 6.2 दिवसांमध्ये ही संख्या दुप्पट होते. काही राज्यांमध्ये मोठी सुधारणा दिसत असून त्यात केरळ, ओडिशा या मोठ्या राज्यांचा समावेश आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील 13.6  टक्क्यांवर पोहोचले असल्याची सकारात्मक बाब केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी अधोरेखित केली. लॉकडाऊनचा प्रभाव दिसू लागल्याचे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू

कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला

‘कोरोना’ विरोधातील लढ्यासाठी कायदाही सक्षम हवा; विधी तज्ज्ञांचे मत

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसभारतमुंबईमृत्यू