Coronavirus : मुंबई पोलिसांना १० हजार सुरक्षा किटचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 11:15 AM2020-04-05T11:15:02+5:302020-04-05T11:18:07+5:30

Coronavirus : मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलिसांसाठी सुरक्षा साधन संचाचे व स्पेशल प्लास्टीक मास्क वाटप प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आले.

Coronavirus 10000 security kits distributed to Mumbai police SSS | Coronavirus : मुंबई पोलिसांना १० हजार सुरक्षा किटचे वाटप

Coronavirus : मुंबई पोलिसांना १० हजार सुरक्षा किटचे वाटप

Next

मुंबई - कोरोना पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेचा ताण वाढत आहे. या काळातही आपले पोलीस अत्यंत उत्तम रितीने कार्य करत आहेत. या संसर्गाचा मुकाबला करताना त्यांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, शासन त्यांच्या सदैव पाठीशी आहे असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी सांगितले.

मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलिसांसाठी सुरक्षा साधन संचाचे (किट) व स्पेशल प्लास्टीक मास्क वाटप प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग , सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विनय चोबे, सहपोलीस आयुक्त (प्रशासन) नवल बजाज, आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. एकुण १० हजार सुरक्षा किट वितरण करण्यात येणार आहे.

राज्यातील पोलीस यंत्रणा या काळात आरोग्याचा धोका पत्कारुन १६-१६ तास कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पोलिसांच्या सुरक्षेबाबत आधुनिक अशा या आरोग्याबाबतच्या सुरक्षा साधन संचाचे वाटप करण्यात येत आहे. ही बाब महत्वपुर्ण व अभिनंदनीय आहे. आपण वापरत असलेल्या नेहमीच्या मास्क व्यतिरिक्त या संचातील साधनांचा उपयोग केल्यास  त्याचा फायदा पोलिसांना आरोग्य सुरक्षा दृष्टिने नक्कीच होईल असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : ...म्हणून 'पबजी' 24 तास राहणार बंद

Coronavirus : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3500 वर, 'या' वयोगटातील लोकांना सर्वाधिक धोका

Coronavirus : धक्कादायक! ICU ला असलेल्या कुलूपाने संपवला तिचा जीवनप्रवास

Coronavirus : कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सचा तब्बल 250 किमीचा प्रवास

 

Web Title: Coronavirus 10000 security kits distributed to Mumbai police SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.