Join us  

Sushant Singh Rajput Case: 'पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं'; संजय निरुपम यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 11:54 AM

Sushant Singh Rajput Case: काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी मुंबई पोलीस आणि पालिकेवर निशाणा साधला आहे.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी वेगाने तपास सुरू आहे. रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हणत काहींनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता बिहार पोलीस देखील मुंबईत दाखल झाले आहेत. याच दरम्यान आता सुशांत आत्महत्येप्रकरणी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMC ने केलं क्वारंटाईन केल्याची घटना समोर आली आहे. यावरून काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी मुंबई पोलीस आणि पालिकेवर निशाणा साधला आहे.

पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं असं म्हणत संजय निरुपम यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी सोमवारी (3 ऑगस्ट) एक ट्विट केलं आहे. "मुंबई पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना 15 ऑगस्टपर्यंत क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. चौकशी कशी होणार?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करावा. तिवारी यांची सुटका करून त्यांना तपास कामात मदत करावी.  नाही तर मुंबई पोलिसांवरील संशय आणखी वाढेल" असं ट्विट निरुपम यांनी केलं आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी आणि बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेने त्यांना क्वारंटाईन केलं आहे. बिहार पोलिसांनी तिवारी यांना जबरदस्तीने क्वारंटाईन केल्याचा आरोप केला आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधी एक ट्विट केलं आहे. 

"आयपीएस अधिकारी बिनय तिवारी पोलीस टीमचं नेतृत्त्व करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत पोहोचले. मात्र त्यांना बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने क्वारंटाईन केलं आहे. विनंती करून देखील त्यांची आयपीएस मेसमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली नाही आणि आता त्यांना गोरेगावमधील एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं आहे" असं ट्विट गुप्तेश्वर पांडे यांनी केलं आहे. बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांकडून हवं तसं सहकार्य मिळत नसल्याची टीका अनेकांनी केली होती. तसेच मुंबई पोलीस मदत करत नसल्याचं म्हटलं जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धक्कादायक! टेस्ट केल्यानंतर 'या' शहरात गायब झाले 2290 कोरोना पॉझिटिव्ह, परिसरात खळबळ

Video - ...अन् पाकिस्तानी न्यूज चॅनलवर अचानक फडकला भारताचा झेंडा

Sushant Singh Rajput Case: मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMCने जबरदस्तीने केलं क्वारंटाईन, बिहार पोलिसांचा आरोप

CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात 9,509 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 4 लाखांवर

CoronaVirus News : भारीच! प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तरुणांचा पुढाकार, रिक्षा सॅनिटायझेशन यंत्र केलं तयार

CoronaVirus News : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोनाची लागण

CoronaVirus News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसंजय निरुपमकाँग्रेससुशांत सिंगपोलिसउद्धव ठाकरेबिहार