Congress, NCP leaders' relationship with landmafias - Modi | Maharashtra Election 2019 :काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांचे भूमाफियांशी संबंध - मोदी
Maharashtra Election 2019 :काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांचे भूमाफियांशी संबंध - मोदी

पनवेल/अकोला/परतूर : दिल्लीमध्ये तुम्ही नरेंद्रला बसवले त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देवेंद्रला पुन्हा संधी द्या. दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र हा फॉर्म्युला पाच वर्षांपासून सुपरहिट आहे, असे सांगताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अंडरवर्ल्डमधील भूमाफियांशी संबंध होते, त्यामुळे येथील रिअल इस्टेटमध्ये भ्रष्टाचाराचा पैसा ओतण्यात आला. मात्र, ‘रेरा’सारख्या कायद्याने भूमाफियांना आवर बसला, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी खारघरमधील प्रचारसभेत केला.


विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ अकोला, परतूर (जि. जालना) व नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या सभांमध्ये मोदी यांनी
काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली.
काँग्रेसच्या काळात मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार देशाबाहेर कसे पळून गेले, त्यांचे कोणत्या नेत्यांशी संबंध होते, असे प्रश्न उपस्थित करतानाच, काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या भ्रष्ट आघाडीने सिंचन घोटाळा करून महाराष्टÑाला विकासात मागे ठेवल्याचा आरोप त्यांनी अकोला येथील सभेत केला. ते म्हणाले, एके काळी महाराष्टÑात नित्य बॉम्बस्फोट होत असत. मुंबई धास्तावली होती. त्या काळी झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांचे मास्टरमाइंड देशाबाहेर पळून गेले. ते आता शत्रू देशांमध्ये तळ ठोकून आहेत. असे मोठे गुन्हेगार कसे पळून गेले, याचे उत्तर काँग्रेसने देशाला दिले
पाहिजे.


गँगस्टर मिर्चीशी कुणाचे संबंध?
कुख्यात गँगस्टर इक्बाल मिर्चीची संपत्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने विकत घेतल्याप्रकरणी अंमलबजावणी महासंचालनालय म्हणजेच ईडीने चौकशी सुरू केल्यासंदर्भात, कुणाचेही नाव न घेता, गँगस्टर व राष्टÑवादीच्या नेत्यांमध्ये काय संबंध आहेत, याची पाने आता उघड झाली असल्याचे मोदी म्हणाले. महाराष्टÑाला रक्ताने रंगविणाऱ्या लोकांबरोबर कुणाचे संबंध होते? कुणाचा त्यांच्या उद्योगात सहभाग होता? त्यांच्या सोबत कोण मौजमस्ती करीत होते? हे सगळे आता बाहेर येत आहे. त्यामुळेच अशा लोकांनी काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांची बदनामी सुरू केली आहे; पण आता काळ बदलला आहे. त्यांच्या प्रत्येक कृष्णकृत्याचे उत्तर देश त्यांच्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही पंतप्रधानांनी यावेळी दिला.
आज परळीत सभा ग्रामविकास मंत्री आणि भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरूवारी सकाळी १० वाजता विजय संकल्प सभा होणार आहे.


‘वॉटर ग्रीड’मधून दुष्काळमुक्ती
२०१४ पूर्वी मराठवाडा विभागाच्या विकासासाठी निधी मंजूर व्हायचा. परंतु, हा निधी तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच त्यांचे चेले-चपाटे फस्त करायचे. याचा परिणाम मराठवाडा मागास राहण्यावर झाला. मात्र मराठवाड्यात जलयुक्त शिवार ही योजना क्रांतीकारक ठरली. आता दुष्काळ मुक्तीसाठी वॉटर ग्रीड ही महत्त्वकांक्षी योजना लाभदायक ठरणार आहे. जालना येथील ड्रायपोर्ट, आयसीटी, सिडस्पार्क, औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहत झोन, कौशल्य विकास योजना याबाबींमुळे उद्योग वाढीसह गुंतवणूक वाढून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. 


नवी मुंबई विमानतळ लवकरच
नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. कोकणचा हा परिसर भारतातील नव्या अर्थव्यवस्थेचा गड ठरणार आहे. कोकणातील समुद्र पर्यटनामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे, असे स्पष्ट करून मच्छीमार खºया अर्थाने देशाचे राखणदार आहेत. समुद्रजीवांना प्लास्टिकचा धोका होणार नाही, याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले.


Web Title: Congress, NCP leaders' relationship with landmafias - Modi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.