‘उमेदवाराने जास्तीचा खर्च केल्यास करा तक्रार’, निवडणूक आयोगाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 10:27 AM2024-04-30T10:27:05+5:302024-04-30T10:28:37+5:30

लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवारांनी करावयाच्या निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

complaint if candidate spends excessively election commission instructions to the political parties and candidates for lok sabha election 2024 | ‘उमेदवाराने जास्तीचा खर्च केल्यास करा तक्रार’, निवडणूक आयोगाचे निर्देश

‘उमेदवाराने जास्तीचा खर्च केल्यास करा तक्रार’, निवडणूक आयोगाचे निर्देश

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवारांनी करावयाच्या निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यासाठी खास खर्च निरीक्षक नियुक्त केले जात आहेत. जेथे उमेदवार जास्तीचा खर्च किंवा इतर आर्थिक व्यवहार होत असेल त्याची माहिती एका फोनवर तुम्ही निरीक्षकांना देऊ शकता.  भारत निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती केलेली असते. 

खर्च निरीक्षण उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवू शकतात. त्यांना काही चुकीचा प्रकार सुरू असल्याचे आढळ्यास त्याची चौकशी करू शकतात. जास्तीची रोख रक्कम, मौल्यवान भेट वस्तू, मद्य असे आढळल्यास चौकशी करून जप्त करू शकतात. 

एखादा उमेदवार जास्तीचा खर्च करत असेल, पैशाचे आमिष दाखवून मतदान करण्यास भाग पाडले जात असेल, जास्तीची रोख रक्कम ठेवलेली असेल, अशा निवडणुकीशी संबंधित गैरआर्थिक व्यवहारांची माहिती कोणीही खर्च निरीक्षक यांना देऊ शकतात.

Web Title: complaint if candidate spends excessively election commission instructions to the political parties and candidates for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.