बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी संकेतस्थळाच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 13:22 IST2017-11-17T13:21:29+5:302017-11-17T13:22:44+5:30
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार खाली खेचण्याचा इशारा दिलेला असताना आणि शिवसेना-भाजपाचे संबंध कमालीचे ताणले गेले असताना ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले आहेत.

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी संकेतस्थळाच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे एकत्र
मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार खाली खेचण्याचा इशारा दिलेला असताना आणि शिवसेना-भाजपाचे संबंध कमालीचे ताणले गेले असताना ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त फडणवीस आणि उद्धव यांच्या उपस्थितीत महापौर निवासात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यासाठी एकत्र आले होते. स्मृतिदिनाचे औचित्य साधून उद्धव ठाकरे हे शेतक-यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 2 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे यावेळी सुपूर्द करणार आहेत.