आरे कॉलनीत मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात चिपको आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 15:47 IST2019-09-22T15:39:21+5:302019-09-22T15:47:22+5:30
आरे कॉलनीत मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात आज(रविवारी) मुंबईकरांसह पर्यावरण प्रेमी, विविध संस्था एकवटल्या होत्या.

आरे कॉलनीत मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात चिपको आंदोलन
मुंबई: आरे कॉलनीत मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोड़ीविरोधात आज(रविवारी) मुंबईकरांसह पर्यावरण प्रेमी, विविध संस्था एकवटल्या होत्या. या आंदोलनात जवळपास हजार नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. तरुणांनी मानवी साखळी तयार करुन पुन्हा मेट्रो कारशेड प्रकल्पातील वृक्ष तोड़ीला तीव्र विरोध केला आहे.
आरे कॉलनीत मेट्रो कारशेड विरोधात मुंबईकर पर्यावरणप्रेमीसह विविध संस्था, ग्रुप, लहान मुले, सेव आरे ग्रुप, आदिवासी हक्क संवर्धन समिति, संस्था मार्फत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमीटीतर्फे मेट्रो कारशेड जवळील झाडाला "चिपको आंदोलन" कार्यकर्त्यांसमवेत केले.
माहुल वासीय प्रकल्पाबाधित लोकांनी देखील आरे कॉलनीतील वृक्ष तोडी विरोधात आंदोलन केले. आम्ही माहुल प्रकल्प ग्रस्त जे भोगत आहोत, ते मुंबई करांच्या वाट्याला येऊ नये, असे वाटत असेल तर आरे वाचवा, माहुल प्रकल्प ग्रस्त जीवन बचाव आंदोलन महिला, वृद्धांनी सहभाग घेतला.