छत्रपती संभाजीराजे पहिल्यांदाच करणार उपोषण; ठाकरे सरकारवर केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 05:15 PM2020-01-09T17:15:34+5:302020-01-09T17:15:42+5:30

मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे.

Chhatrapati Sambhajiraje will fast for the first time; Serious charges against Uddhav Thackeray goverment | छत्रपती संभाजीराजे पहिल्यांदाच करणार उपोषण; ठाकरे सरकारवर केला गंभीर आरोप

छत्रपती संभाजीराजे पहिल्यांदाच करणार उपोषण; ठाकरे सरकारवर केला गंभीर आरोप

Next

मुंबई: सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी जाहिर केले आहे. संभाजीराजे सारथी संस्थेसाठी पुण्यात आंदोलन करणार असून याबाबतचे निवेदन दिलं आहे. 

संभाजीराजे यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे, विशेष म्हणजे या संस्थेचे उदघाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. 

तसेच दुसऱ्या दिवशी मी सारथीच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन, दोन्ही बाजूंची भूमिका समजुन घेतली आणि सरकार स्थिरस्थावर होईस्तोवर कुठलाच नवीन आदेश न काढण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु जे. पी. गुप्ता हे प्रधान सचिव दररोज नवीन आदेश काढून संस्थेला बदनाम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना अशी कोणती घाई झाली आहे, की दररोज आदेश काढत आहेत? असा सवाल देखील संभाजीराजे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच आज मला जाणीव झाली आहे की, लोकशाही मार्गाने या मनमानी विरोधात लक्षणिक उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही. 11 जानेवारीपासून सारथी कार्यालयाजवळ शेकडो कार्यकर्ते आणि सारथीच्या लाभार्थ्यांसोबत उपोषणाला बसणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. 


 
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी) राज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी 'सारथी' संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सारथी संस्थेतील अनेक वादविवाद समोर येत आहेत. सारथी संदर्भात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यावर त्वरीत बैठक घेवून यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितले होते.

Web Title: Chhatrapati Sambhajiraje will fast for the first time; Serious charges against Uddhav Thackeray goverment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.