शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 12:11 IST2025-05-20T12:09:44+5:302025-05-20T12:11:31+5:30

Chhagan Bhujbal News: १९९१ पासून शपथ घेत आहे. विविध विभाग सांभाळले आहेत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

chhagan bhujbal first reaction after taking minister oath and said from 1991 working on many departments | शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”

शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”

Chhagan Bhujbal News: राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राजभवनावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांचा शपथविधी पार पडला. मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यावर छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. 

मीडियाशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ओल इज वेल. ज्या गोष्टीचा शेवट चांगला, त्याचे सगळे चांगले. १९९१ पासून विविध विभाग सांभाळले आहेत. गृहमंत्रालयापासून ते सगळे काही सांभाळले आहे. खात्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. कोणत्याही खात्याची अपेक्षा केलेली नाही. कोणताही विभाग मिळाला तरी चालेल. जो विभाग मिळेल तो सांभाळेन, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदी, अमित शाह यांचे आभार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, आमच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे आभार मानतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस, महात्मा फुले समता परिषद आणि माझ्या मतदारसंघातील सर्वांचे आभार मानतो. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ते रडत आहेत यासंदर्भात मी सरकारशी बोलणार आहे, असे भुजबळ सांगितले.

दरम्यान, छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यासंदर्भात भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, त्यांचे मी आभार मानतो, असा टोला भुजबळांनी लगावला. दुसरीकडे, महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना स्थान मिळाले नव्हते. यावरून भुजबळ यांनी तीव्र शब्दांत अनेकदा नाराजी व्यक्त केली. अजित पवारांवर टीकाही केली. अजित पवारांनी मंत्रिपदावरून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भुजबळांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. 

 

Web Title: chhagan bhujbal first reaction after taking minister oath and said from 1991 working on many departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.