Chhagan Bhujbal: 'तुमचा भुजबळ करू...' म्हणणाऱ्यांना जशास तसं उत्तर मिळालंय; छगन भुजबळांचा विरोधकांवर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 02:45 PM2021-09-09T14:45:20+5:302021-09-09T14:46:18+5:30

Chhagan Bhujbal: 'सत्य परेशान हो सकता है...लेकिन पराजीत नहीं', असं म्हणत छगन भुजबळ यांनी विरोधकांना प्रत्त्युतर दिलं आहे.

Chhagan Bhujbal attacks the opposition after acquitted in maharashtra sadan scam case | Chhagan Bhujbal: 'तुमचा भुजबळ करू...' म्हणणाऱ्यांना जशास तसं उत्तर मिळालंय; छगन भुजबळांचा विरोधकांवर हल्लाबोल 

Chhagan Bhujbal: 'तुमचा भुजबळ करू...' म्हणणाऱ्यांना जशास तसं उत्तर मिळालंय; छगन भुजबळांचा विरोधकांवर हल्लाबोल 

Next

Chhagan Bhujbal: 'सत्य परेशान हो सकता है...लेकिन पराजीत नहीं', असं म्हणत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सर्व आरोपातून दोष मुक्त झाल्यावर विरोधकांना प्रत्त्युतर दिलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालयानं आज छगन भुजबळ यांची कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील सर्व आरोपातून मुक्तता केली आहे. भुजबळांचं नाव आता या प्रकरणातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे भुजबळांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. भुजबळांनी आरोपातून दोष मुक्त झाल्याच्या कोर्टाच्या निकालावर आनंद व्यक्त केला आणि न्यायदेवतेचा आभारी असल्याचं म्हटलं. 

"सत्य परेशान हो सकता है...लेकीन पराजीत नहीं...असं म्हणतात त्याची प्रचिती आज आली आहे. तुम्ही जर खरे असाल तर कधीना कधी विजय तुमचाच होतो आणि कथित महाराष्ट्र सदर घोटाळ्यात माझं काहीच नव्हतं. ते आम्ही कोर्टासमोर पुराव्यानिशी मांडू शकलो आणि न्यायदेवतेनं आमचं म्हणणं ऐकून घेत योग्य निर्णय दिला", असं छगन भुजबळ म्हणाले. 

विरोधकांवर साधला निशाणा
"काही लोकांनी आम्हाला त्रास द्यायचं ठरवलं आहे. पण तुमची बाजू सत्याची असेल तर घाबरण्याचं काही कारण नसतं. त्यामुळे आज राज्यात अनेकांविरोधात कारवाया सुरू आहेत. पण तेही न्यायानं लढा देऊन यातून मुक्त होतील", असं भुजबळ म्हणाले. आज कोर्टानं दिलेला निकाल तुमचा भुजबळ करू म्हणणाऱ्यांना प्रत्युत्तर आहे, असंही ते म्हणाले. 

कोणाकोणाची नावं वगळली?
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकण कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ, तनवीर शेख , इरम शेख , संजय जोशी , गीता जोशी , पीडब्ल्यूडी सचिव गंगाधर मराठे यांचं नावही महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून वगळण्यात आलं आहे.

Web Title: Chhagan Bhujbal attacks the opposition after acquitted in maharashtra sadan scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.