मालाडमध्ये चाळीचा भाग कोसळला; ५ ते ६ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 15:40 IST2020-07-16T15:39:33+5:302020-07-16T15:40:16+5:30
तळमजला अधिक दोन मजली चाळीचा भाग कोसळ्याची दुर्घटना घडली.

मालाडमध्ये चाळीचा भाग कोसळला; ५ ते ६ जण जखमी
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच मालाड-मालवणी येथील प्लाट नंबर ८ बी वरील तळमजला अधिक दोन मजली चाळीचा भाग गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळ्याची दुर्घटना घडली. दुर्घटनेत ५ ते ६ जण अडकल्याचे प्राथमिक वृत्त असून, येथे शोधकार्य हाती घेण्यात आले आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत कार्याला सुरुवात केली. शिवाय ढिगारा उपसण्याचेही काम हाती घेतले. येथे अडकलेल्या २ व्यक्तींना अग्निशमन दलाच्या वतीने बाहेर काढण्यात आले. आणि १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होईपर्यंत येथे अडकलेल्या दोन व्यक्तींना नागरिकांनी खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी ४ फायर इंजिन, १ रेस्क्यू व्हॅन आणि रुग्णवाहिका तैनात असून, शोधकार्य सुरु आहे.