Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC Election Results 2026: मुंबईत पहिल्या ४६ जागांचे कल समोर, भाजपा-शिंदेसेनेला आघाडी, ठाकरे बंधूंकडून कडवी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:48 IST

BMC Mumbai Municipal Election Results 2026 : राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यामधील ४६ जागांचे कल आता समोर आले आहेत.

राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यामधील ४६ जागांचे कल आता समोर आले आहेत. त्यामध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने आघाडी घेतली आहे. तर ठाकरे बंधूंची युती कडवी झुंज देत आहे  तसेच काँग्रेसनेही काही जागांवर आघाडी घेत खातं उघडलं आहे. मुंबई महानगरपालिका निकालाचे सर्व अपडेट्स इथे पहा Live 

मतमोजणीच्या पहिल्या अर्ध्या तासानंतर समोर आलेल्या कलांमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या युतीने ४६ पैकी २७ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामध्ये भाजपा १५ आणि शिंदेसेने १२ जागांवर आघाडीवर आहे. तर ठाकरे बंधूंच्या युतीने १६ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात उद्धवसेना ११ आणि मनसे ५ जागांवर आघाडीवर आहे. तर वंचितसोबत आघाडी करून लढणाऱ्या काँग्रेसनेही ३ जागांवर आघाडी घेतली आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी काल सुमारे ५२.९४ टक्के एवढं मतदान झालं होतं. तर मतदानानंतर समोर आलेल्या सर्वच एक्झिट पोलमधून मुंबईमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर ठाकरे बंधूंच्या युतीला १०० च्या आत जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.  

English
हिंदी सारांश
Web Title : BMC Election 2026: BJP-Shinde lead in early Mumbai results.

Web Summary : Early BMC election results show BJP-Shinde alliance leading in Mumbai. Thackeray brothers offer tough competition. Congress opens account. Out of 46 seats, BJP-Shinde alliance leads in 27 while Thackeray leads in 16.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६भाजपाशिवसेनामनसेकाँग्रेस