'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 21:56 IST2026-01-10T21:56:24+5:302026-01-10T21:56:53+5:30
मुंबईतील निवडणुकीत वातावरणात सी-व्होटर या संस्थेकडून लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नातून त्यांची मते जाणून घेतली.

'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे निवडणुकीत एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू यांच्या युतीमुळे ठाकरे ब्रँडची चर्चा सातत्याने होत आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे हे एकमेव ब्रँड होते इतर कुणीही नाही असं भाजपा शिंदेसेनेकडून पलटवार केला जातो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीमुळे भाजपा महायुतीला फटका बसणार नाही. या दोघांची मते कमी झाली आहेत असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जातो. मात्र C-Voter या संस्थेने नुकताच एक सर्व्हे केला आहे ज्यातून ठाकरे ब्रँड, राज-उद्धव युती, मराठी मते आणि मुंबईचा महापौर याबाबत लोकांचा कल समोर आला आहे.
२० वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहे. शिवशक्ती युती या नावाने उद्धवसेना-मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत २२७ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र या ठाकरे बंधू युतीमुळे मराठी मते त्यांच्याकडे वळतील का, या दोघांना खरेच निवडणुकीत फायदा होईल का यासारखे अनेक प्रश्न सगळ्यांना पडलेले आहेत. त्यातच मुंबईतील निवडणुकीत वातावरणात सी-व्होटर या संस्थेकडून लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नातून त्यांची मते जाणून घेतली. त्यात मराठी भाषिकांसोबत हिंदी भाषिकांनाही प्रश्न विचारण्यात आले आहेत.
| भाषिक | हो | कमकुवत झालेत | नाही | सांगता येत नाही |
| मराठी | ४९.२ टक्के | २५.३ टक्के | ९.३ टक्के | १६.२ टक्के |
| हिंदी | २४ टक्के | ४८.४ टक्के | १४.२ टक्के | १३.३ टक्के |
| भाषिक | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | राज ठाकरे | कुणीच नाही | ब्रँड संपलाय | सांगता येत नाही |
| मराठी | ४४.३ टक्के | २५.५ टक्के | १०.८ टक्के | ८.४ टक्के | ५.५ टक्के | ५.५ टक्के |
| हिंदी | २६.६ टक्के | ४०.२ टक्के | ११.०३ टक्के | १०.३ टक्के | ८.८ टक्के | २.८ टक्के |
| भाषिक | हो | कदाचित हो | नाही | नक्की नाही | सांगता येत नाही |
| मराठी | ५४.८ टक्के | ८.३ टक्के | १२.८ टक्के | १२.७ टक्के | ११.३ टक्के |
| हिंदी | ४२.१ टक्के | ११.१ टक्के | १४.८ टक्के | ९.९ टक्के | २२.२ टक्के |
| भाषिक | हो | नाही | सांगता येत नाही |
| मराठी | ६९.९ टक्के | १४.१ टक्के | १५.३ टक्के |
| हिंदी | २३.२ टक्के | ५१.४ टक्के | २५.४ टक्के |