Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई खरोखरच ठाकरेंच्या हातातून निसटली; उबाठा अन् मनसे मिळूनही भाजपला गाठू शकत नाहीत... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:48 IST

BMC Election Result 2026 Statistics : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ चा अधिकृत निकाल. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेला किती मते मिळाली? २२७ जागांचे पक्षनिहाय विश्लेषण वाचा.

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सार्वत्रिक निवडणुकीचे अधिकृत निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वाधिक ८९ जागा जिंकून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने ६५ जागांसह दुसरे स्थान मिळवले आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार, ही मराठी लोकांची शेवटची निवडणूक अशी आवाहने ठाकरे बंधूंकडून केली जात होती. परंतू निवडून आलेल्या आकड्यांचे विश्लेषण काहीही असले तरी मतांच्या टक्केवारील मुंबई मात्र ठाकरे बंधूंच्या हातातून निसटल्याचेच समोर येत आहे. 

भाजपला मुंबईत ११,७९,२७३ मते मिळालेली आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ७,१७,७३६ आणि राज ठाकरेंच्या मनसेला ७४,९४६ मते मिळाली आहेत. यावरून भाजपाला ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा तब्बल 4,61,537 मते जास्त मिळाली आहेत. ठाकरेंच्या मतांमध्ये मनसेची मते जरी मिळविली तरी ठाकरेंची मिळून 7,92,682 मते होतात. तरी देखील भाजपाच्या मतांमध्ये 3,83,591 एवढा मोठा फरक उरत आहे. 

भाजपने २१.५८% मतांसह ८९ जागांवर विजय मिळवून मुंबईत आपली ताकद सिद्ध केली आहे. विजयी उमेदवारांच्या एकूण मतांपैकी तब्बल ४५.२२% वाटा भाजपचा आहे. ६५ जागा जिंकून उद्धव ठाकरे गटाने मुंबईत आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. जागांचा आकडा सोडला तर मतांच्या आकड्यात भाजपाने ठाकरेंकडून मुंबई केव्हाचीच हिसकावून घेतल्याचे दिसत आहे. 

राजकीय पक्षाचे नावविजयी उमेदवारमिळालेली वैध मतेएकूण मतदानाच्या %
भारतीय जनता पार्टी (BJP)८९११,७९,२७३२१.५८%
शिवसेना (UBT)६५७,१७,७३६१३.१३%
शिवसेना (एकनाथ शिंदे)२९२,७३,३२६५.००%
इंडियन नॅशनल काँग्रेस२४२,४२,६४६४.४४%
AIMIM६८,०७२१.२५%
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)७४,९४६१.३७%
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)२४,६९१०.४५%
समाजवादी पार्टी१५,१६२०.२८%
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)११,७६००.२२%
एकूण२२७२६,०७,६१२४७.७२%

शिंदे फुटल्याचा परिणाम...

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २९ जागा जिंकल्या आहेत. शिंदेच्या शिवसेनेला महापालिका निवडणुकीत २,७३,३२६ मते पडली आहेत. जी एकूण मतदानाच्या 5 टक्के एवढी आहेत. उबाठाला १३.१३% मते मिळाली आहेत. भाजपा-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढविल्याने शिंदेसेनेची बहुतांश मते भाजपाला गेली आहेत. तरी देखील भाजपा आणि शिंदेसेनेची मते एकत्र केली तर ती ठाकरे बंधुंवर प्रचंड मोठी आघाडी उभी करत आहेत. हा आकडा जवळपास 14,52,599 एवढा जात आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai slips from Thackeray's grasp; BJP leads BMC elections.

Web Summary : BJP won the BMC elections with 89 seats, surpassing Shiv Sena (UBT). Despite Thackeray's appeals, BJP secured significantly more votes, even when combining UBT and MNS votes. Shinde's Sena secured 29 seats, further impacting Thackeray's hold.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६उद्धव ठाकरेराज ठाकरेभाजपाएकनाथ शिंदेशिवसेनामनसे