संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; शिवतीर्थावर २० मिनिटे बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 06:55 IST2026-01-04T06:53:56+5:302026-01-04T06:55:56+5:30
देशातील अनेक मोठे नेते कधीच बिनविरोध निवडून आले नव्हते. मग, या लोकांनी बिनविरोध निवडून येण्यासाठी असे कोणते कर्तृत्व केले? असा सवाल संजय राऊतांनी केला.

संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; शिवतीर्थावर २० मिनिटे बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा
मुंबई : उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी शिवतीर्थ निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. यावेळी संयुक्त प्रचाराची रणनीती, संभाव्य युतीची रूपरेषा तसेच संयुक्त जाहीरनाम्याबाबत चर्चा झाली. शिवसेना भवनात रविवारी दोन्ही पक्षांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली.
खा. राऊत यांनी उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवरून प्रश्न उपस्थित केले. देशातील अनेक मोठे नेते कधीच बिनविरोध निवडून आले नव्हते. मग, या लोकांनी बिनविरोध निवडून येण्यासाठी असे कोणते कर्तृत्व केले? असा सवाल केला. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून बळजबरीने उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडणे, असा आरोपही त्यांनी केला.