शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला; वांद्रे येथे प्रचार करताना झाला जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 05:48 IST2026-01-08T05:47:01+5:302026-01-08T05:48:18+5:30
सलीम कुरेशी शिंदेसेनेत येण्यापूर्वी एमआयएमचे मुंबई सरचिटणीस होते.

शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला; वांद्रे येथे प्रचार करताना झाला जीवघेणा हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वांद्रे पश्चिमेच्या ज्ञानेश्वरनगरमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर बुधवारी प्रचार करीत असताना अनोळखी हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.
कुरेशी हे वॉर्ड क्रमांक ९२ मधून शिंदेसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. हल्ल्यात त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. कुरेशी यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले.
गुन्हेगारी पार्श्वभूमी
सलीम कुरेशी शिंदेसेनेत येण्यापूर्वी एमआयएमचे मुंबई सरचिटणीस होते. त्यांच्या विरोधात २०१९मध्ये बीकेसी पोलिस ठाण्यात भादंवि संहितेच्या ३०२,१४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३ खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा खटला मुंबई सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.
हल्ल्यामागील कारण? : कुरेशींवरील हल्ला राजकीय वैमनस्यातून करण्यात आला की, वैयक्तिक शत्रुत्वातून याचा तपास सुरू आहे. घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज पाहून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्नही सुरू आहे.