भाजप कार्यालयातून एबी फॉर्म चोरीला; सायन पोलिसांत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:12 IST2026-01-04T13:12:54+5:302026-01-04T13:12:54+5:30
शिल्पा केळुसकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप कार्यालयातून एबी फॉर्म चोरीला; सायन पोलिसांत गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाजप कार्यालयातून एबी फॉर्मचोरी झाल्याचा गंभीर आरोप राजकीय करण्यात आला असून या प्रकरणामुळे वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुंबई भाजप कार्यालयातील ऑफिस सेक्रेटरी दिनेश जगताप (५०) यांनी सायन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार, शिल्पा केळुसकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबी फॉर्म चोरीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक १७३ साठी भाजप उमेदवार म्हणून शिल्पा दत्ताराम केळुसकर यांना २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दादर येथील वसंत स्मृती भाजप कार्यालयातून एबी फॉर्म देण्यात आला होता.
मात्र, नंतर शिंदेसेना-भाजप यांच्यात झालेल्या बैठकीत सदर जागा शिंदेसेना उमेदवार दत्ताराम पूजा रामदास कांबळे यांना देण्याचानिर्णय झाल्याने केळुसकर यांना एबी फॉर्म परत करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी सायंकाळी शिल्पा केळुसकर यांनी भाजप कार्यालयात येऊन एबी फॉर्म परत केला.
वरिष्ठांशी केली चर्चा
हा फॉर्म कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आला होता. मात्र, ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी शिंदेसेना उमेदवार पूजा कांबळे यांचे पती रामदास कांबळे यांनी शिल्पा केळुसकर यांनी हाच एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी, सायन येथे जमा केल्याची माहिती दिल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर कार्यालयातील संबंधित ड्रॉवर तपासला असता एबी फॉर्म आढळून आला नाही. या प्रकरणी वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.