bjp mp udayanraje bhosale meet mns chief raj thackeray in his mumbai krushna kunj residence | मोठी बातमी! उदयनराजे भोसले 'कृष्णकुंज'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

मोठी बातमी! उदयनराजे भोसले 'कृष्णकुंज'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) हे मुंबईत 'कृष्णकुंज'वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या भेटीला गेले आहेत. उदयनराजे यांच्या या भेटीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या दोन नेत्यांमध्ये भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. 

उदयनराजे भोसले यांनी याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीही मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती. यासोबतच राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fhadnavis) यांनाही उदयनराजे मराठा आरक्षणासंदर्भात भेटले होते. त्यानंतर आज उदयनराजे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. आज संयकाळी ५ वाजता उदयनराजे त्यांच्या काही सहकाऱ्यांसह 'कृष्णकुंज'वर पोहोचले आहेत.

विशेष म्हणजे, उदयनराजे यांची कृष्णकुंजवर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्याशी भेट होत असल्यानं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यात आज मराठी भाषा दिनाच्या दिवशी ही भेट होत आहे. 
राज यांच्या भेटीनंतर उदयनराजे प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. त्यामुळे राज यांच्या भेटीनंतर उदयनराजे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bjp mp udayanraje bhosale meet mns chief raj thackeray in his mumbai krushna kunj residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.