ठाकरे सरकारच्या जाहिराती निव्वळ धूळफेक; त्या टीव्हीवर बघून लोक शिव्या घालतात- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 01:53 PM2021-03-13T13:53:36+5:302021-03-13T13:53:44+5:30

अधिवेशनात अधिकाऱ्यांनी दिलेली आकडेवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी वाचून दाखवली, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे. 

BJP MP Narayan Rane has criticized the state government | ठाकरे सरकारच्या जाहिराती निव्वळ धूळफेक; त्या टीव्हीवर बघून लोक शिव्या घालतात- नारायण राणे

ठाकरे सरकारच्या जाहिराती निव्वळ धूळफेक; त्या टीव्हीवर बघून लोक शिव्या घालतात- नारायण राणे

Next

मुंबई: राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणार आहे. तो राज्याचा नसून फक्त पुणे केंद्रीत अर्थसंकल्प आहे, अशी टीका भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे यांनी शुक्रवारी (12 मार्च) पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या अर्थसंकल्पातील अनेक गोष्टींवर आपली भूमिका मांडली.

नारायण राणे म्हणाले की, अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढवून दाखवले आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. ठाराविक ठिकाणी सरकारने खर्च केला आहे. पुणे शहराच्या रस्त्यांसाठी तरतूदी करण्यात आल्या आहेत. मात्र मुंबईतील सागरी मार्गासाठी काहीच दिले नाही. अर्थसंकल्पामध्ये  1 लाख कोटींची तूट आहे. त्यामुळे ती कशी भरुन काढणार, याबाबत सरकारने काही स्पष्ट केलेलं नाही. अधिवेशनात अधिकाऱ्यांनी दिलेली आकडेवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी वाचून दाखवली, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे. 

महाराष्ट्र सरकारच्या टीव्हीवर सुरू असलेल्या जाहिराती ही निव्वळ धूळफेक आहे. या जाहिराती बघून लोक ठाकरे सरकारला शिव्या घालत आहेत. कोकणातील चक्रीवादळाच्या समस्येवर एक रूपयाही आला नाही, असं नारायण राणे यांनी सांगितलं. 

ठाकरे आणि पवार यांच्या आश्वासनांना काही किंमत नाही. सरकारने आता केवळ आश्वासन न देता, प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी. MPSC परीक्षांच्या बाबतीत सरकारने पूर्णपणे गोंधळ घालून ठेवला आहे. केंद्र आणि मुंबई महापालिकेच्या अनेक योजनांचा उल्लेख अर्थसंकल्पात केलाय. हे करता येतं का? याचे पैसे तुम्ही देणार आहेत का?” असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला.

सरकार कोरोनाबद्दल बोलत आहेत, पण देशातील सर्वाधिक कोरोना हॅाटस्पॅाट हे महाराष्ट्रात आहेत. देशातल्या 10 जिल्ह्यांमधील 8 जिल्हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात पुन्हा लॅाकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री बोलत आहेत. देशातील रूग्णांच्या तुलनेत 60 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत,” असंही नारायण राणे यांनी नमूद केलं.

मुकेश अंबानींसारख्या उद्योगपतीला धमक्या दिल्या जातात, सुपारी दिली जाते आणि त्याच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी सापडते. एक पोलीस अधिकाऱ्याची बाजू मुख्यमंत्री घेतात. सचिन वाझेची मुख्यमंत्र्यांना भरपूर काळजी आहे. याच्याशिवाय आपलं संरक्षण कोण करणार नाही असंच त्यांना वाटतंय. दिशा सालिअनवर बलात्कार झाला, हत्या झाली, तरी सरकार कोणाला काही करत नाही, असं टीकास्त्र नारायण राणे यांनी सोडलं आहे. 

Web Title: BJP MP Narayan Rane has criticized the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.