Join us  

ट्विटला असाच प्रतिसाद द्यावा; नितेश राणेंनी मानले उद्धव ठाकरेंचे खोचक आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 2:51 PM

मुख्यमंत्र्यांनी सोमवारी नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेण्याचे निर्देश दिले आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडसाठी वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सोमवारी नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेण्याचे निर्देश दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाणार आंदोलकांवरील गुन्हे माफीच्या निर्णयानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे त्यांचे  खोचक आभार मानले आहे.

उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडसाठी वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेण्यात यावे अशी मागणी नितेश राणे यांनी ट्विटद्वारे केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर आपल्या ट्विटला आसाच प्रतिसाद द्यावा असा टोला देखील नितेश राणे यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून निर्णयांचा धडाका लावला आहे. दोन दिवसापूर्वी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे स्वागत होत असताना उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नाणार रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहे.

टॅग्स :नीतेश राणे उद्धव ठाकरेनाणार प्रकल्पआरेमेट्रोपोलिसशिवसेनाभाजपा