"शिवसेनेत हिंमत असेल तर, औरंगजेबाची कबर उखडून दाखवा; मी स्वत: त्यांच्याबरोबर येण्यास तयार"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 04:06 PM2022-05-16T16:06:13+5:302022-05-16T16:08:02+5:30

भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी तर आता शिवसेनेला आव्हानच दिले आहे.

BJP leader Prasad Lad has now challenged Shiv Sena. | "शिवसेनेत हिंमत असेल तर, औरंगजेबाची कबर उखडून दाखवा; मी स्वत: त्यांच्याबरोबर येण्यास तयार"

"शिवसेनेत हिंमत असेल तर, औरंगजेबाची कबर उखडून दाखवा; मी स्वत: त्यांच्याबरोबर येण्यास तयार"

Next

मुंबई-  एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे देखील दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील विविध नेते यावरुन टीका करत आहे. 

भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी तर आता शिवसेनेला आव्हानच दिले आहे. शिवसेनेत हिंमत असेल तर त्यांनी औरंगजेबाची कबर उखडून दाखवावी, याकरिता वैयक्तिक मी स्वतः त्यांच्याबरोबर यायला तयार आहे..., असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

खुल्ताबादमध्ये गेल्यानंतर सर्वजण औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतात असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यावरुन कोणताही वाद निर्माण करणे चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशी अत्याधुनिक शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासाठीच  एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुल्ताबाद या ठिकाणी जाऊन सर्व दर्ग्यांचं दर्शन घेतल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं होतं. 

दरम्यान, बीकेसीमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनीभाजपासह एमआयएमवर देखील निशाणा साधला. औरंगाबादमध्ये ओवेसींच्या झालेल्या सभेचा उल्लेख करताना भाजपाच्या ए.बी.सी. टीमा पुढे केल्या जातात. कुणाला थडग्यावर डोकं टेकायला लावतात, कुणाला घंटा बडवायला दिला जातो, तर कुणाला भोंगा दिला जातो. आमच्या संभाजीनगरमध्ये असे म्हणत संभाजीनगरचा उल्लेख करताना, नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं नाही. आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर टिका आणि तुम्ही गेले तेव्हा काय? असे म्हणत पहाटेच्या शपथविधीवर उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.  

'...त्यांनी इथे येऊन राजकारण करु नये'- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील आता सदर प्रकरणाचा निषेध केला आहे. एखादा राजकारणी बाहेरून येऊन औरंगजेबच्या समाधीला जातो या गोष्टीचा मी निषेध करतो, असं शरद पवार म्हणाले. तसेच राज्यात कुठेतरी जातीपातीचे राजकारण होत असून त्याला महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास माहीत नाही त्याने इथे येऊन राजकारण करू नये, अशा शब्दात शरद पवारांनी ओवेसींना ठणकावले आहे. 

Web Title: BJP leader Prasad Lad has now challenged Shiv Sena.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.