BJP leader Gopichand Padalkar and NCP president Sharad Pawar took a look, said BJP leader Udayan Raje Bhosale | शरद पवारांबाबत पडळकरांनी केलेल्या विधानावर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

शरद पवारांबाबत पडळकरांनी केलेल्या विधानावर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबई: धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं वादग्रस्त विधान केले होते. 

गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे पडसाद गेल्या काही दिवसांपासून राज्यभर उमटत आहे. त्यातच आता गोपीचंद पडळकरांनी केलेल्या शरद पवरांवरील विधानावर भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

उदयनराजे म्हणाले की, कोणी कोणाबद्दल काय बोलले हे त्यांनी मला विचारुन बोलले नाही. तसेच जे कुणी उत्तर देणार आहेत, ते मला विचारुन देणार नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. त्यामुळे गोपीचंद पडळकर आणि शरद पवार त्यांचे ते बघून घेतील, असं उदयनराजे भोसले यांनी सांगितले. 

गोपीचंद पडळकर यांनी नक्की काय विधान केलं होतं-  

शरद पवारांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. पण या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. फडणवीसांनी धनगरांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पाच वसतिगृह, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या निर्णयाचा समावेश आहे. मात्र यासाठी सध्याच्या सरकारनं एक रुपयाही दिला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर आम्हाला बोलावं लागेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं.

अन्य महत्वाच्या बातम्या- 

गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

पडळकरांना नशा चढलीय, पवारांच्या अनुभवापुढे ते डासाएवढेही नाहीत; गोटेंची जळजळीत टीका

शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला

"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा

"भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर..."; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BJP leader Gopichand Padalkar and NCP president Sharad Pawar took a look, said BJP leader Udayan Raje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.