Vidhan Sabha 2019: ‘शरीफ यांच्या घरी बिर्याणी खाणाऱ्यांनी सल्ला देऊ नये’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 04:40 IST2019-09-20T04:39:47+5:302019-09-20T04:40:48+5:30
शरद पवार काय बोलले, याची माहिती न घेता पंतप्रधान चुकीचा व खोटा प्रचार करत आहेत.

Vidhan Sabha 2019: ‘शरीफ यांच्या घरी बिर्याणी खाणाऱ्यांनी सल्ला देऊ नये’
मुंबई : शरद पवार काय बोलले, याची माहिती न घेता पंतप्रधान चुकीचा व खोटा प्रचार करत आहेत. ते म्हणतात तसे विधान पवारांनी केलेलेच नाही. पाकचे राज्यकर्ते व सैन्यदल भारतविरोधी आहे. पण तेथील जनता तशी नाही, असे पवार म्हणाले होते. पाकचे राज्यकर्ते तर तुम्हालाच चांगले वाटतात. म्हणून तर तुम्ही काबूलहून दिल्लीला येताना विमान लाहोरला उतरवून नवाज शरीफ यांचा वाढदिवस साजरा करायला आणि बिर्याणी खायला गेला होता, असा पलटवार राष्टÑवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.