Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:28 IST2025-08-19T19:26:31+5:302025-08-19T19:28:12+5:30

Monorail Passengers Trapped Video: सकाळपासून मुंबईत मुसळदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे लोकल रेल्वेसेवा बंद झाल्या आहेत.

Big news! Monorail closed, passengers trapped; Efforts underway to break glass | Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

Monorail Stuck on Track: सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे लोकल रेल्वेसेवा बंद झाल्या आहेत. पण, मोनोरेल्वे सेवा सुरू होत्या. दरम्यान, मोनो रेल्वे मध्येच बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनेक प्रवासी अडकले आहेत. रेल्वेमधील एसी बंद पडल्यामुळे प्रवाशांना त्रास सुरू झाला आहे. तर दुसरीकडे, दरवाजे पॅक आहेत. प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  

घटनेदरम्यान प्रवाशांनी तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. त्याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने प्रवाशांची सुटका करण्याचे मदतकार्य सुरू आहे.

मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट

गेल्या एक तासांपासून मोनो रेल्वेचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधी  रेल्वे अचानक बंद पडली. यानंतर रेल्वेतील एसी आणि लाईट बंद झाली. एसी बंद झाल्यामुळे अनेकांना त्रास सुरू झाला. काहीजण चक्कर येऊन पडले आहेत, मोनो रेल्वेकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही यामुळे लोक घाबरले आहेत.

अग्निशमनचे जवान शिडीचा वापर करुन प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे मोनो रेल्वेचे टेक्लिकल टीम दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकल रेल्वे बंद असल्यामुळे मोनो रेल्वेमध्ये मोठी गर्दी झाली आहे. ही गाडी प्रवाशांनी भरली आहे.

मोनो रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून घाबरुन जाऊ नका थोड्याच वेळात बाहेर काढण्यात येईल असं सांगण्यात आले आहे.

एक तासानंतर प्रवाशांना खाली उतरवले

एक तासाच्या प्रयत्ननंतर मोनो रेल्वे प्रशासनाला दरवाजे उघडण्याचा प्रयत्न सुरू आहेत.  काच फोडून प्रवाशांना एक एक करुन खाली उतरवले जात आहे. अग्निशमनच्या जवानांनी शिड्या लावून प्रवाशांना खाली उतरवले जात आहे. या प्रवाशांची आता वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. 

Web Title: Big news! Monorail closed, passengers trapped; Efforts underway to break glass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.