दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, निकाल लवकरच लागणार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 13:22 IST2025-04-06T13:18:39+5:302025-04-06T13:22:39+5:30

या वर्षी दहावीचा निकाल लवकर लावण्यासाठी बोर्डाने मोठी तयारी केली आहे.

Big news for class 10 students, when will the results be out? Read in detail | दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, निकाल लवकरच लागणार? वाचा सविस्तर

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, निकाल लवकरच लागणार? वाचा सविस्तर

मागील महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात दहावीची परीक्षा संपली. परीक्षा संपल्याने विद्यार्थी टेन्शन फ्री झाले आहेत. पण, आता विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. मागील वर्षी दहावी आणि बारावीचा निकाल लवकर लावण्यात आला होता. या वर्षीही निकाल १५ मे'च्या आधीच निकाल लावण्याची तयारी बोर्डाची आहे.  

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एसएससी म्हणजे दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. मार्च महिन्यात ही परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. शिक्षण विभागाकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू आहे. यावर्षी १५ मे पूर्वीच निकाल लावण्याची तयारी बोर्डाने केल्याचे सांगण्यात येत आहे. 

"रेकॉर्डवर उपमुख्यमंत्री, पण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच"; खासदार धैर्यशील मानेंचं विधान

पुढे लगेचच अॅडमिशनची प्रक्रिया सुरू होते, त्यामुळे लगेच निकाल लावण्याची तयारी सुरू आहे.  विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, जुलैच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षा होणार आहेत. यामुळे निकाल मे महिन्याच्या १५ तारखेपर्यंत निकाल लावण्यात येणार आहे. पण, निकालाची तारीख अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही.  

कोकण बोर्डात कॉपी प्रकरण ‘शून्य’

 दहावीच्या बोर्ड परीक्षेत कोकण विभागीय मंडळात एकही प्रकार गेल्या पाच परीक्षेत आढळलेला नाही. यावर्षीही तीच परंपरा अबाधित असून विभागीय मंडळात दहावी परीक्षेत कॉपीचा रकाना निरंकच आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळापैकी रत्नागिरीच्या या मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा ही संस्कृती सर्वांच्या सहकार्याने रुजवली आहे. बारावी परीक्षेत रत्नागिरीत एक कॉपी प्रकाराची नोंद झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अंतर्गत कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सन २०१२ पासून कार्यरत आहे. सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यात आल्यामुळेच त्याचा सकारात्मक परिणाम झाला.

Web Title: Big news for class 10 students, when will the results be out? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.