मोठी बातमी! निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला कोर्टानं दिला जामीन, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 06:31 PM2022-11-18T18:31:48+5:302022-11-18T18:32:22+5:30

वाझेच्या जामीन अर्जावर १५ नोव्हेंबरला सुनावणी झाली होती. आज १८ नोव्हेंबरला कोर्टाने निकाल सांगितला. 

Big news! Court granted bail to suspended police officer Sachin Vaze in money laundring case | मोठी बातमी! निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला कोर्टानं दिला जामीन, पण...

मोठी बातमी! निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला कोर्टानं दिला जामीन, पण...

Next

मुंबई - कथित १०० कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाला त्याच खटल्यात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला PMLA कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. परंतु दिलासा मिळूनही वाझे जेलबाहेर येऊ शकत नाही. अद्यापही त्याच्यावर २ खटले सुरू आहेत. या दोन्ही प्रकरणात सचिन वाझेला जामीन मिळाला नाही. त्यामुळे सचिन वाझेला जेलमध्येच राहावे लागणार आहे. 

शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्या. आरएन रोकडे यांनी म्हटलं की, तपासावेळी आरोपीला अटक होऊ शकत नाही. त्यामुळे PMLA कलम ४५ लागू होत नाही. अनिल देशमुख यांना याप्रकरणी जामीन मिळालाय तीच भूमिका सचिन वाझे सुनावणीत आहे. वाझेला जामीन देऊ शकतो. यावेळी ईडीच्या वकिलांनी सचिन वाझेच्या जामिनाला विरोध केला परंतु ईडीची मागणी कोर्टाने फेटाळून लावली. वाझेच्या जामीन अर्जावर १५ नोव्हेंबरला सुनावणी झाली होती. आज १८ नोव्हेंबरला कोर्टाने निकाल सांगितला. 

कोण आहे सचिन वाझे?
१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. याच काळात सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. 

सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला होता. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे याचे महाविकास आघाडी सरकार असताना जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. मात्र मनसुन हिरेन हत्याकांड आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्यामुळे सचिन वाझे पुन्हा अडचणीत आले. 
 

Web Title: Big news! Court granted bail to suspended police officer Sachin Vaze in money laundring case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.