भारत जोडो न्याय यात्रा: ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील सभेला शरद पवारांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 06:24 IST2024-03-13T06:24:37+5:302024-03-13T06:24:49+5:30

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. या यात्रेचा समारोप मुंबईत होत आहे.

bharat jodo nyay yatra sharad pawar presence at the meeting of india alliance in mumbai | भारत जोडो न्याय यात्रा: ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील सभेला शरद पवारांची उपस्थिती

भारत जोडो न्याय यात्रा: ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील सभेला शरद पवारांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने येत्या १७ मार्चला दादरच्या शिवाजी पार्कवर होत असलेल्या इंडिया आघाडीच्या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. 

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. या यात्रेचा समारोप मुंबईत होत आहे. यात्रेच्या निमित्ताने इंडिया आघाडीने मुंबईत शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना इंडिया आघाडीच्या सभेचे निमंत्रण दिले.  शरद पवार यांनी हे  निमंत्रण स्वीकारल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. भारत जोडो न्याय यात्रेची सांगता १६ मार्चला मुंबईत चैत्यभूमी येथे होईल. 

 

Web Title: bharat jodo nyay yatra sharad pawar presence at the meeting of india alliance in mumbai