BEST Strike Live: अखेर 'संप'ला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 08:51 AM2019-01-16T08:51:47+5:302019-01-16T12:28:04+5:30

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल सुरुच

BEST Strike Live: अखेर 'संप'ला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे | BEST Strike Live: अखेर 'संप'ला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

BEST Strike Live: अखेर 'संप'ला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

Next

मुंबई: बेस्ट कामगारांचा संप नवव्या दिवशीही सुरुच आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हालदेखील सुरुच आहेत. काल राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीनं बेस्ट कामगारांच्या मागण्यांबद्दलचा अहवाल उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. त्यामुळे बेस्टचा संप मिटेल असं वाटत होतं. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप करत संप सुरुच राहणार असल्याची घोषणा कामगार नेते शशांक राव यांनी केली. 

बेस्ट कामगारांचा संप मिटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंशी संवाद साधला होता. मात्र यावरुन शशांक राव यांनी उद्धव यांच्यावर गंभीर आरोप केला. बेस्ट कामगारांना एक पैही द्यायची नसल्यानं तुम्ही कामगारांमध्ये पडू नका, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचा खळबळजनक आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला. त्यामुळे आता लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही, अशी घोषणाच त्यांनी मंगळवारी रात्री कामगार मेळाव्यात केली. त्यामुळे आज नवव्या दिवशीही बेस्ट कामगारांचा संप सुरूच राहणार आहे. सकाळी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेतं, यावर या संपाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

LIVE

Get Latest Updates

12:24 PM

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
 

12:23 PM

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
 

12:02 PM

बेस्ट संपाबद्दल हायकोर्टात सुनावणी सुरू
 

12:01 PM

10 ऐवजी 15 टप्प्यांमध्ये वेतनवाढ द्या; बेस्ट कर्मचाऱ्यांची मागणी
 

10:46 AM

बेस्ट संपाबाबत आज हायकोर्टात सुनावणी

10:28 AM

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल

10:28 AM

बेस्ट संप सुरूच ठेवण्याचा कामगारांचा निर्धार


Web Title: BEST Strike Live: अखेर 'संप'ला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.