Video : माटुंग्यात बेस्टच्या बसला लागली भीषण आग; सर्व प्रवासी सुखरूप 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 05:01 PM2019-07-31T17:01:38+5:302019-07-31T17:02:36+5:30

या घटनेत कोणीही प्रवासी जखमी नसून सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. 

Best bus caught fire in Matunga; All travelers are safe | Video : माटुंग्यात बेस्टच्या बसला लागली भीषण आग; सर्व प्रवासी सुखरूप 

Video : माटुंग्यात बेस्टच्या बसला लागली भीषण आग; सर्व प्रवासी सुखरूप 

Next
ठळक मुद्दे बस ड्राइवरच्या केबीनमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डला आग लागली. बसचालकाने बस ब्रिजच्या खाली घेऊन फायर सिलेंडरने आग विजवली.

मुंबई - माटुंगा येथील महेश्वरी उद्यानाजवळ बेस्टच्या बसने घेतला पेट असून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे काम  करत आहेत. आज दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास ही आग लागली आहे. बेस्टच्या वरळी डेपोची बस रूट क्रमांक २७ ची बस मुलुंड येथून वरळीकडे येत असताना महेश्वरी उद्यान ब्रिजवरून जात असताना बस ड्राइवरच्या केबीनमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डला आग लागली. बसचालकाने बस ब्रिजच्या खाली घेऊन फायर सिलेंडरने आग विजवली. या घटनेत कोणीही प्रवासी जखमी नसून सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. 

Web Title: Best bus caught fire in Matunga; All travelers are safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.